Monday , September 21 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये दिवंगत अनंत जाधव यांची आदरांजली सभा

Spread the love

 

बेळगाव : दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी मराठी विद्यानिकेतनचे सचिव, द.म.शि. मंडळाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य, सीमा चळवळीतील कार्यकर्ते दिवंगत अनंत जाधव यांची आदरांजली सभा पार पडली. दिनांक १ सप्टेंबर रोजी अनंत जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. अनंत जाधव हे मराठी विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक सचिव होते. मराठी विद्यानिकेतन शाळेच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. सभेच्या अध्यक्षस्थानी मराठी विद्यानिकेतन शाळेचे अध्यक्ष श्री. सुभाष ओऊळकर होते.

व्यासपीठावर प्रा.आनंद मेणसे, प्रा. सुरेश पाटील, मुख्याध्यापक बी.जी. पाटील, एन.सी. उडकेकर होते. प्रथम शाळेचे संगीत शिक्षक सहदेव कांबळे यांनी आदरांजलीपर गीत गायले. यानंतर शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, शाळेच्या समन्वयक सविता पवार, शिक्षक शांताराम पाटील, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, माजी विद्यार्थी सीए विनायक जाधव, माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेहल पोटे, प्राध्यापक आनंद मेणसे यांनी आपल्या मनोगतांमधून अनंत जाधव यांच्या कार्याचा आढावा घेतला. व्यवहारातील पारदर्शकपणा, शिक्षकांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, स्वच्छतेच्या बाबतीत काटेकोरपणा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना तळमळीने शिकवलेच पाहिजे असा आग्रह, शिक्षकांविषयी आपुलकी, शाळेच्या बांधकामाचा विकास , सामाजिक कार्य, सीमा चळवळीसाठीचे योगदान, या सर्वांवर वक्त्यांनी प्रकाश टाकला.

यावेळी शाळा सुधारणा समितीचे सदस्य प्रा. आनंद पाटील, डॉ. वंदना गुरव, शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, गौरी चौगुले, माजी विद्यार्थी ज्ञानेश ओऊळकर, विशाल बाळेकुंद्री, नमिता ताशिलदार, साईनाथ बडमंजी, शिक्षकवर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार शैला पाटील यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *