Sunday , July 26 2026
Breaking News

जातनिहाय सर्वेक्षणाबाबत सकल मराठा समाजाची वडगाव भागात जनजागृती

Spread the love

 

बेळगाव : सध्या सुरू असलेल्या जातनिहाय सामाजिक सर्वेक्षणात मराठा समाजाने कशा पद्धतीने नोंद करावी या संदर्भात मार्गदर्शन व जनजागृती करण्यासाठी सकल मराठा समाज वडगाव विभागाची बैठक ज्ञानेश्वर मंदिरात पार पडली.

बैठकीला मराठा समाजातील विविध नेते मंडळींनी मार्गदर्शन करत जनगणतीत मराठा समाजाने धर्म हिंदू, जात मराठा, उपजात कुणबी, आणि मातृभाषा मराठी असा उल्लेख करावा असे आवाहन करत उपजात कुणबी नोंद केल्यास भविष्यात त्याचा फायदा काय होणार आहे याची सविस्तर माहिती करून दिली.

यावेळी भाजप नेते किरण जाधव, महापौर मंगेश पवार, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, अमोल देसाई, शिवराज पाटील, जयराज हलगेकर, महादेव पाटील, देवकुमार बिर्जे, राजू मर्वे, शंकर चौगुले, उमेश पाटील, वर्षा आजरेकर, माधुरी जाधव, प्रिया हलगेकर, शिवानी पाटील, सारिका पाटील, माधुरी बिर्जे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *