Sunday , July 26 2026
Breaking News

52 मतदारांना सोबत घेऊन माजी खासदार रमेश कत्ती यांचे शक्तीप्रदर्शन!

Spread the love

 

बेळगाव : हुक्केरी मतदार संघातून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार माजी खासदार रमेश कत्ती यांनी आज पुन्हा एकदा आपल्या मतदार क्षेत्रातील 52 मतदारांना सोबत घेऊन शक्तीप्रदर्शन करत नामनिर्देश पत्र दाखल केले आहे. काल मंगळवारी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी हुकेरी मतदारसंघातील आपल्या 42 समर्थकांच्या पाठिंब्याने राजेंद्र पाटील यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले होते तर आज खासदार कत्ती यांनी 52 समर्थक मतदारांसह अर्ज दाखल करून आपली ताकद दाखवून दिली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी खासदार कत्ती म्हणाले, जिल्ह्यातील कोणत्याही मतदारसंघाचे नेतृत्व करणार नाही त्या त्या तालुक्यातील नेत्यांनी विचारविनिमय करून योग्य निर्णय घ्यावा. त्या निर्णयासोबत आपण असणार समविचारी लोकांनी एकत्र येऊन तोडगा काढल्यास बँकेच्या हितासाठी मी पुढील वाटचाल करेल असे त्यांनी यावेळी सांगितले. माझे समर्थक असलेले 52 मतदार सदस्यांना सोबत घेऊन मी दुसऱ्या फेरीत उमेदवारी अर्ज भरला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यालय पाहण्याची इच्छा असलेल्या मतदारांना मी सोबत आणले आहे असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *