Sunday , July 26 2026
Breaking News

ट्रॅक्टर उलटून दोन युवकांचा मृत्यू; अथणी तालुक्यातील घटना

Spread the love

 

बेळगाव : ट्रॅक्टरचा अपघात होऊन दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना महाराष्ट्रातील मुचंडी गावाजवळ घडली आहे.

या अपघातात अथणी तालुक्यातील चीकट्टी गावचे अभिषेक आरवेकरी (वय 22 वर्षे) आणि सलमान मुक्केरी (वय 18 वर्ष) हे दोघे युवक जागीच मृत्युमुखी पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर ओढण्याच्या स्पर्धेसाठी जात असताना हा अपघात झाला. ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने तो पलटी झाला आणि दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत आणखी दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने चीकट्टी गावात शोककळा पसरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *