Sunday , July 26 2026
Breaking News

कंडक्टर पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपी पती अटकेत!

Spread the love

 

बेळगाव पोलिसांनी सौन्दत्ती येथे कंडक्टर पत्नीचा खून करून फरार झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात यश मिळवले आहे.

सौन्दत्ती येथे घटस्फोट घेतलेल्या पत्नीचा पोलीस कॉन्स्टेबलने निर्घृण खून केल्याच्या प्रकरणासंदर्भात आज बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, सौन्दत्ती येथे कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या काशव्वावर तिचा पोलीस कॉन्स्टेबल पती संतोष कांबळे याने यापूर्वी हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला अटक करून सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. सहा महिन्यांपूर्वी काशव्वाने घटस्फोट घेतला असतानाही, संतोषने तिचा खून केला. “ज्या दिवशी हा खून झाला, त्याच दिवशी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी संतोष कांबळेला अटक केली आहे,” अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *