Monday , September 21 2026
Breaking News

“त्या” महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थान पुढाकार

Spread the love

 

बेळगाव : अगरबत्ती पॅकिंग व्यवसायाच्या नावाखाली बेळगाव परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. या फसवणुकीला बळी पडलेल्या महिलांनी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांची भेट घेऊन आज साई भवन जुने बेळगाव येथे श्रीराम सेना हिंदुस्थानच्या आयोजित बैठकीत आपला संताप व्यक्त केला आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्याकडे आपली कैफियत मांडली.

श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पोलीस प्रशासनाच्या वतीने शहापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक सीमानी हे उपस्थित होते. जिल्हा पोलीस प्रशासनाने या प्रकरणात तपासाची गती वाढविण्याचे आदेश दिले असल्याचे यावेळी पोलीस निरीक्षक सीमानी यांनी सांगितले. साई भवन येथे झालेल्या बैठकीत अगरबत्ती घोटाळ्यात बळी पडलेल्या हजारो महिला उपस्थित होत्या. या बैठकीदरम्यान पीडित महिलांची सविस्तर माहिती एकत्रित करण्यात आली. जेणेकरून एकत्रित स्वरूपात पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करता येईल.

यावेळी रमाकांत कोंडुस्कर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, बेळगावसह परिसरातील महिलांना फसविलेल्या भामट्याविरुद्ध श्रीराम सेना हिंदुस्थान तीव्र लढा देईल. त्याचप्रमाणे शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सीमानी यांनी देखील महिलांना मार्गदर्शन केले व महिलांनी यापुढे कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे सांगत महिलांनी केलेल्या तक्रारीवर योग्य ती कारवाई होईल असे आश्वासन दिले. सदर बैठकीला प्रशांत भातकांडे, अनिल अंबरोळे, किरण हुद्दार सुनील बोकडे हेही उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *