Sunday , July 26 2026
Breaking News

अथणी येथे न्यायाधीशांच्या समोरच महिलेवर प्राणघातक हल्ला

Spread the love

 

बेळगाव (वार्ता) : अथणी येथील न्यायालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. मंगळवारी दुपारी न्यायालयीन कामकाज सुरू असताना एका महिलेचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याने कोर्ट परिसरात खळबळ माजली.

मीनाक्षी रामचंद्र शिंदे (वय 50) असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. कोतनटी येथील बाबासाहेब चव्हाण हा आरोपी असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संपत्तीच्या वादातून मीनाक्षी व बाबासाहेब यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. आज सकाळी मीनाक्षी यांच्या मागे लागून आरोपीने कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जीव वाचवण्यासाठी त्यांनी कोर्ट हॉलमध्ये शिरताच, हा प्रकार प्रधान दिवाणी न्यायाधीशांच्या समोरच घडला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे न्यायालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *