Thursday , June 4 2026
Breaking News

विजेच्या धक्क्याने शाळकरी विद्यार्थीनीचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : विजेच्या धक्क्याने शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी सांबरा येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. परिणीती चंद्रू पालकर (वय 13, रा. महात्मा फुले गल्ली, सांबरा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. परिणीती ही सांबरा येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होती.
शुक्रवारी सकाळी घरातील पाण्याची मोटर सुरू करत असताना अचानक तिला विजेचा जोरदार धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की परिणीती जागीच खाली कोसळली. घटनेची गंभीरता लक्षात येताच गल्लीतील युवकांनी तत्काळ तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर परिनीतीला मृत घोषित केले. परिणीतीच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि आजी असा परिवार आहे.

About Belgaum Varta

Check Also

वैश्यवाणी समाजातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक साहित्य वाटप

Spread the love  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *