Monday , September 21 2026
Breaking News

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या तनुज सिंगला रौप्य पदक

Spread the love

 

बेळगाव : हैदराबाद येथील गच्चीबोली येथे पार पडलेल्या साऊथ झोन राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या तनुज सिंग याने चमकदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या या जलतरणपटूने १७ वर्षांखालील (ग्रुप १) गटात कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व केले.

तनुजने १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक ही शर्यत १ मिनिट ०९.४० सेकंद अशा वेळेत पूर्ण करून द्वितीय क्रमांक पटकावला. तो जी.एस.एस. कॉलेजचा विद्यार्थी असून, त्याला आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबचे एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. त्याच्या या यशामुळे बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *