Sunday , July 26 2026
Breaking News

आनंदवाडी आखाड्यात उद्या मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्यातर्फे मोफत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान उद्या रविवार दिनांक 4 जानेवारी रोजी आनंदवाडी आखाड्यात आयोजित करण्यात आल्या आहेत. सदर जंगी कुस्त्यांचे उद्घाटन समारंभाला महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री भरमुआण्णा पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहेत. त्याचबरोबर माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळी, समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले, मराठा समाजाचे नेते किरण जाधव, भूषण काकतकर, डॉ. गणपत पाटील, श्रीराम सेना हिंदुस्थान तालुका अध्यक्ष भरत पाटील, केंपन्नावर, हाणगोजी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विजयी कुस्ती पैलवानांसाठी बेळगाव केसरी वन तसेच महिलांसाठी देखील महिला बेळगाव केसरी वन असे पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. उद्या होणाऱ्या मोफत निकाली कुस्त्यांसाठी आनंदवाडी कुस्ती आखाडा सज्ज झाला असून बेळगावसह परिसरातील सर्व कुस्तीप्रेमी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *