Sunday , July 26 2026
Breaking News

युवा समितीच्या वतीने उद्या भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा

Spread the love

 

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन.
सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन आणि शिवकालीन इतिहास आत्मसात करण्यासोबतच विद्यार्थ्यांचे बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने यंदा देखील भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यंदाचे हे पाचवे वर्ष असून सिमाभागात आयोजित होणारी ही सर्वात मोठी स्पर्धा आहे, या स्पर्धेत बेळगाव शहर, ग्रामीण, खानापूर तालुका आणि निपाणी भागातून विद्यार्थी सहभागी होतात.
ही स्पर्धा मराठा मंदिर कार्यालय आणि तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन खानापूर रोड बेळगाव येथे दोन सत्रात संपन्न होणार आहे.
स्पर्धा सिमाभाग मर्यादित असून चार गटात स्पर्धा आयोजित केली आहे.
१) प्राथमिक विभाग (लहान गट) इयत्ता ४ थी पर्यंत,
२) प्राथमिक विभाग (मोठा गट) इयत्ता ५ वी ते ७ वी
३) माध्यमिक विभाग ८ वी ते १० वी पर्यंत
४) महाविद्यालयीन विभाग (सिमाभाग व्यतिरिक्त आंतरराज्यीय विद्यार्थी सहभागी होऊ शकतात) इयत्ता ११ वी ते पदव्युत्तर (वय वर्षे २८ पर्यंत)
सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता, शिवकालीन इतिहास, शालेय अभ्यासक्रम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व सिमाप्रश्न या संदर्भ पुस्तिकेवर आधारित विषयावर स्पर्धा असेल.
विजयी स्पर्धकांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, पदक, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे तर सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागी झालेबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी १०.०० वाजता संपन्न होणार आहे. यावर्षी स्पर्धेला २५०० स्पर्धक येण्याचा अंदाज आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *