Sunday , July 26 2026
Breaking News

ए. व्ही. कराटे ॲकॅडमीच्या सृष्टी जाधवची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण कामगिरी

Spread the love

 

बेळगाव व गोव्यातील काता – कुमिते स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश

बेळगाव : ए.व्ही. कराटे ॲकॅडमीची उदयोन्मुख खेळाडू व समाजसेविका सौ. माधुरी जाधव (पाटील) यांची कन्या कु. सृष्टी स्वप्नील जाधव हिने राष्ट्रीय व आंतरराज्यीय कराटे स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. दि. २१ डिसेंबर रोजी बेळगाव येथे आयोजित ६व्या राष्ट्रीय निमंत्रित स्तरावरील कराटे स्पर्धेत सृष्टीने कुमिते प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला, तर काता प्रकारात द्वितीय स्थान मिळवले.

यशाची ही घोडदौड सुरू ठेवत सृष्टीने ४ जानेवारी रोजी फोंडा (गोवा) येथे झालेल्या प्रतिष्ठित ‘संकुकाई कप’ कराटे स्पर्धेत काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदकांची कमाई केली. तिच्या या दमदार कामगिरीमुळे क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिला प्रशिक्षक श्री. अमित वेसणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

सृष्टीच्या या यशाबद्दल राज्याच्या महिला बालविकास मंत्री तथा बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार सौ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह काँग्रेसचे युवा नेते श्री. मृणाल हेब्बाळकर यांनी तिचे कौतुक केले असून भावी वाटचालीत सदैव सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. तसेच ए.व्ही. कराटे ॲकॅडमीचे प्रशिक्षक, पालकवर्ग आणि क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *