Thursday , May 28 2026
Breaking News

एपीएमसी मार्केटमधील मटका अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; सहा जणांना अटक

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील एपीएमसी मार्केट परिसरात सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे मटका जुगार खेळणाऱ्या आणि खेळवून घेणाऱ्या अड्ड्यांवर एपीएमसी पोलिसांनी छापा टाकला आहे.

या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून १९ हजार ६०२ रुपयांची रोख रक्कम आणि मटका साहित्य जप्त केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ६ जानेवारी २०२६ रोजी एपीएमसी मार्केट यार्डजवळ जुगार खेळत असताना विनायक कोलकार (वय १९) याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. एपीएमसी पोलीस ठाण्याचे एएसआय जी. एल. कोटबागी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीकडून १,००० रुपये रोख आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. याचबरोरब एपीएमसीचे पीएसआय एस. आर. मुत्तट्टी आणि त्यांच्या पथकाने पाच जणांना अटक केली. यामध्ये किरण भजंत्री (२७), मारुती रजायी (३१), शुभम कडीमनी (२७), अनूप कांगरा (४७) आणि विनायक सोनारवाडी (४१) यांचा समावेश आहे. या आरोपींकडून १८ हजार ६०२ रुपयांची रोकड आणि मटका संबंधित साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण १९ हजार ६०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सहाही आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई यशस्वी केल्याबद्दल बेळगावचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी संबंधित पीएसआय, एएसआय आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

इंधन दरवाढ व खतांच्या किमतींविरोधात शेतकऱ्यांचा आवाज; दर नियंत्रणाची मागणी

Spread the love  बेळगाव : पेट्रोल, डिझेल आणि खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *