Sunday , July 26 2026
Breaking News

सार्वजनिक वाचनालयातर्फे 18 पासून बॅ. नाथ पै व्याख्यानमाला

Spread the love

 

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक वाचनालय, बेळगाव यांच्यातर्फे येत्या रविवार दि. 18 ते मंगळवार दि. 20 जानेवारी 2026 या कालावधीत सलग तीन दिवस दररोज सायंकाळी 5:30 वाजता ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व नामवंत संसदपटू बॅरिस्टर नाथ पै यांच्या स्मरणार्थ बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर व्याख्यानमालेचे यंदाचे हे 51 वे वर्ष आहे. मराठा मंदिर, खानापूर रोड, गोवावेस बेळगाव येथे होणाऱ्या या व्याख्यानमालेचे येत्या रविवारी सायंकाळी 5:30 वाजता महागावचे विचारवंत प्रा. डाॅ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर डाॅ. पाटील हे ‘प्रबोधनातून परिवर्तनाकडे’ या विषयावर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी 19 जानेवारी रोजी गडहिंग्लजचे प्रा. अशपाक मकानदार यांचे ‘बदल हवाच, पण विकृत नको!’ या विषयावर, तर शेवटच्या दिवशी मंगळवारी 20 जानेवारी रोजी बीडचे प्रेरणादायी वक्ते राहुल गिरी यांचे ‘कालचा वारसा आणि उद्याचा वारसदार : नवीन पिढीची जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सदर व्याख्यानमालेचा प्रवेश सर्वांना खुला असून नागरिकांनी याचा बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक वाचनालय बेळगावचे अध्यक्ष नेताजी जाधव व कार्यवाह लता पाटील यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *