Monday , September 21 2026
Breaking News

मायक्रो फायनान्सच्या विरोधात बेळगावात शेतकरी संघटना आक्रमक

Spread the love

 

बेळगाव : मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून बैलहोंगल तालुक्यातील अनिगोळ येथील महिलेने आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ आज बेळगावात शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. बैलहोंगल तालुक्यातील अनिगोळ येथील महिलेने फायनान्स कंपन्यांच्या छळामुळे तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हसीरू सेनेच्या वतीने आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मृत महिलेच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत द्यावी आणि संबंधित फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

२०२५ मध्ये सरकारने कडक कायदा करूनही फायनान्स कंपन्यांची दादागिरी सुरूच असून जिल्ह्यात आतापर्यंत २०० हून अधिक महिलांनी आत्महत्या केल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्येक गावात भेट देऊन अशा प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी राज्य सचिव किशन नंदी यांनी केली. तसेच रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बेळगाव-बेंडीगेरी बस सेवा सुधारण्याची मागणीही आशा जुतदार यांनी केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *