Thursday , June 4 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतन बालवाडी विभागाचा क्रीडा महोत्सव

Spread the love

 

बेळगाव : दिनांक 23/01/2026 व 24/01/2026 या दोन दिवशी मराठी विद्यानिकेतन बालवाडी विभागाचा क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा झाला. पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड विषयाचे शिक्षक सुरेश कुंदेकर तर दुसऱ्या दिवशी क्रीडा शिक्षक श्रीधर बेन्नाळकर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकवून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. क्रीडा महोत्सवाचे प्रतीक म्हणून मुलांना वाघ, सिंह आणि गरुड या प्राण्यांचे चित्र असणारे बॅच देण्यात आले. शिशुवर्ग खेळ गटाच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा ज्योतीचे संचलन करून क्रीडा ज्योत पाहुण्यांच्या हाती सुपूर्द केली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतामध्ये मोबाईल पासून दूर राहून उत्तम आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळावेत असे मार्गदर्शन केले. क्रीडा महोत्सवामध्ये खेळ गटाच्या ‌पालकांचा उत्साही सहभाग दिसून आला.
माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, मार्गदर्शक गौरी चौगुले उपस्थित होते. शिक्षण संयोजिका नीला आपटे व शिक्षक समन्वयक सविता पवार, शिक्षक, बालवाडी शिक्षिका भारती शिराळे, अश्विनी हलगेकर, वरदा देसाई, नयन परमोजी, प्रतिभा चौथे, तेजश्री हंडे, श्रद्धा पावशे, सुनिता पाटील यांचे विशेष परिश्रम लाभले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बालवाडी शिक्षिका रेणू पवार यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

श्रीरामजन्म म्हणजे काळोखावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा आरंभ होय : डॉ. शेवडे

Spread the love  बेळगाव : पराक्रमी असूनही क्रूरकर्मा असलेल्या रावणाने देव, यक्ष, गंधर्व आणि राक्षस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *