Sunday , September 20 2026
Breaking News

एकच ध्यास सीमाप्रश्नाची सोडवणूक: समिती शिष्टमंडळाने घेतली खा. शरद पवार यांची भेट

Spread the love

 

बेळगाव : नुकताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले त्याबद्दल मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे आणि तज्ञ समिती सदस्य दिनेश ओऊळकर व समिती कार्यकर्त्यांनी बारामती मुक्कामी गोविंद बाग येथे जाऊन माननीय शरद पवार साहेब आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या.
समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे आणि तज्ञ समिती सदस्य दिनेश ओऊळकर हे अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाचे दुःख व्यक्त करत असताना सन्माननीय शरद पवार यांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सीमाप्रश्नी खटल्याची संपूर्ण चौकशी केली. यावेळी समिती पदाधिकाऱ्यांनी सीमाभागात सुरु कन्नडसक्ती संदर्भातील सविस्तर माहिती खासदार शरद पवार यांना दिली. तसेच अल्पसंख्यांक आयोगाच्या तसेच सीमा प्रश्नाबद्दलच्या घडामोडींवर चर्चा केली. याबाबत संसदेत आवाज उठविण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना देखील सूचना शरद पवार यांनी दिल्या. त्याचप्रमाणे आपण स्वतः दिल्लीत गेल्यानंतर याबाबत जातीने लक्ष घालू असे आश्वासन देखील यावेळी शरद पवार यांनी समिती पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी उमेश पाटील, शिवाजी पाटील, सुहास हुद्दार, शुभम हंडे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *