Monday , September 21 2026
Breaking News

कै. अजित पवार यांना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने श्रद्धांजली

Spread the love

 

बेळगाव : बेळगांव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जत्तीमठ देवस्थान बेळगांव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त करण्यासाठी शोकसभा घेण्यात आली.

या शोकसभेत जिल्हाध्यक्ष जोतिबा पाटील, सचिव महांतेश कोळूचे, अल्ताफ‌ सनदी, बाळू जाधव, माजी कार्याध्यक्ष मारुती शिंदे, परेश शिंदे, अश्वजीत चौधरी यांनी दादांच्या आठवणींना उजाळा देवून त्यांच्याप्रती असलेल्या भावना मांडून महाराष्ट्रासाठी आणि राष्ट्रवादी कुटुंबासाठी आजवरची सगळ्यात मोठी हानी झाल्याचे सांगून दु:ख व्यक्त केले.

यावेळी रामकृष्ण सांबरेकर, भारती टोपण्णवर, गीता जिनबसप्पगौडर, नागराज कुलकर्णी, जयश्री उमा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *