Monday , September 21 2026
Breaking News

ज्योती सेंट्रल स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा! कराटे आणि जलतरण स्पर्धेत विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कराटे आणि जलतरण स्पर्धेत विशेष यश मिळवले आहे.

कराटे (आंतरराष्ट्रीय स्पर्धा, गोवा):

श्रीशा बाळकृष्ण मासेकरः कुमितेत सुवर्ण व कटा प्रकारात कांस्य पदक.

स्वरा बाळकृष्ण मासेकरः कटा प्रकारात सुवर्ण व कुमितेत रौप्य पदक.

जलतरण (पीव्हीआर चॅम्पियनशिप, बेळगाव):

वेदांत मिसाळेः ५० व १०० मी. बटरफ्लाय आणि आय.एम. मध्ये सुवर्ण, तर बँक स्ट्रोक व फ्री स्टाईलमध्ये रौप्य पदक. त्याला स्पर्धेतील ‘विजेतेपद’ (Championship) देऊन गौरविण्यात आले.

या यशाब‌द्दल शाळेचे चेअरमन प्रा. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. आर. एस. पाटील, सेक्रेटरी प्रो. नितीन घोरपडे आणि मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे. या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे पाठबळ आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यांना देण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *