Sunday , July 26 2026
Breaking News

मच्छे गावात क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचा अवमान करण्याचा प्रयत्न; तपास सुरू

Spread the love

 

बेळगाव : गुरुवारी रात्री उशिरा मच्छे गावात क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याला काही अज्ञात व्यक्तींनी काही पदार्थ लावून अवमान करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करून पुतळ्यावरील पदार्थाचा नमुना गोळा करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळापासून सुमारे १० मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

तक्रारदाराची चौकशी करण्यात आली आहे आणि घटनेचा सखोल तपास सुरू आहे, असे पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले.

घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण आहे.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *