Sunday , September 8 2024
Breaking News

खानापूर

खानापूर तालुका गॅरंटी योजना अनुष्ठान समितीची स्थापना; अध्यक्षपदी सूर्यकांत कुलकर्णी यांची नियुक्ती

  खानापूर : कर्नाटक सरकारच्या महत्त्वकांक्षी योजना असलेल्या पाच गॅरंटी योजनाच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने कमिट्यांची रचना केली आहे. जिल्हास्तरीय तालुकास्तरीय सरकारी नियुक्त कमिट्या करण्यात आल्या असून खानापूर तालुका गॅरेंटी योजना अनुष्ठान समितीच्या अध्यक्षपदी माडीगुंजीचे काँग्रेस कार्यकर्ते सूर्यकांत कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी मंजुनाथ आळवणी यांच्यासह 15 …

Read More »

मणतुर्गा येथे घर कोसळून नुकसान

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मणतुर्गे गावातील प्रकाश रावबा देवकरी, सूर्याजी गणपती देवकरी, हणमंत देवकरी यांच्या राहत्या घराची भिंत अतिवृष्टीमुळे कोसळली असून ती घराशेजारी असलेल्या श्री नागेश देव मंदिरावर पडली. त्यामुळे मंदिराचे देखील नुकसान झाले आहे. दुपारच्या वेळी देवकरी कुटुंबीय कामानिमित्त घराबाहेर गेलेले असताना भिंत कोसळली, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी …

Read More »

जिल्हा पालकमंत्र्यांनी केली खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

  मंत्री सतीश जारकीहोळी यांनी जनतेच्या तक्रारी स्वीकारून समस्या सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या बेळगाव : जिल्ह्यातील संभाव्य अतिवृष्टी/पुराच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी (26 जुलै) खानापूर तालुक्यातील पूरग्रस्त व पावसाने नुकसान झालेल्या भागांना भेट दिली. जांबोटी रोडवरील कुसमळी पूल, त्यानंतर खानापूर ते जांबोटीला जोडणाऱ्या मध्यभागी …

Read More »

धो धो पावसातच नेला “त्या” दुर्दैवी महिलेचा मृतदेह आणि केले अंत्यसंस्कार..

  खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला उपचारासाठी तिरडीवरून चार किलोमीटर आणावे लागले होते. गेल्या शुक्रवारी दुपारी आमगांव येथील महिला हर्षदा हरिश्चंद्र घाडी (वय 38) हिला दुपारी अचानक छातीत दुखून चक्कर येऊ लागली. त्यामुळे गावातील नागरिकांनी तिला प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हर्षदा …

Read More »

निःपक्षपातीपणे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी; खानापूर तालुका काँग्रेसची मागणी

  खानापूर : तालुक्यात यावर्षी जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे तालुक्यात बऱ्याच घरांची पडझड होत आहे. पडझड झालेल्या घरांचे ताबडतोब पंचनामे करून तहसिलदार कार्यालयाकडे पाठवायचे आहेत. यासाठी पडझड झालेल्या घरांचे पंचनामे व्यवस्थित व्हावेत, पीडीओ व इंजिनियर यांनी लोकांना नाहक त्रास देऊ नये, स्वताच्या पगारातील पैसे द्यायचे असल्यासारखे जनतेशी वागू …

Read More »

तिरडीवरून नेलेल्या आमगावच्या “त्या” दुर्दैवी महिलेचा अखेर मृत्यू

  खानापूर : खानापूर तालुक्यातील एका टोकास वसलेल्या दुर्गम भागातील आमगाव येथील महिलेला उपचारासाठी तिरडीवरून चार किलोमीटर आणावे लागले होते. गेल्या शुक्रवारी दुपारी आमगाव येथील महिला हर्षदा हरिश्चंद्र घाडी (वय 38) हिला दुपारी अचानक छातीत दुखून चक्कर येऊ लागली. त्यामुळे गावातील नागरिकांनी तिला प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा …

Read More »

नंदगड ग्राम पंचायतीने लक्ष देण्याची मागणी

  खानापूर : नंदगड-हलशी रस्त्याच्या शेजारी चन्नेवाडी तलावाच्या वरील बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी मारलेल्या चरीमध्ये नंदगड ग्राम पंचायतीने कचरा टाकल्याने चरीतुन पाणी तलावात मिसळत आहे. तलावातील पाणी शेतीसाठी तसेच गुरांना पाणी पाजण्यासाठी वापरले जाते, या कचऱ्यातून प्लास्टिक पिशव्या, बाटल्या तसेच पाण्यात न विरघळणारे साहित्य येत असल्याने गुरांच्या जीवाला धोका निर्माण …

Read More »

खानापूरात भांडी दुकानात चोरी; 4 लाखांची भांडी लंपास

  खानापूर : खानापूर येथील रेल्वे ओव्हर ब्रिज जवळच असलेल्या राजा टाईल्स शेजारी स्क्रॅप आणि भांड्याच्या दुकानातील नवीन भांड्यासह अनेक वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या. जवळपास 3 ते 4 लाखाच्या किमतीची भांडी चोरट्यांनी सोमवारी रात्री 12:40 ते 3 च्या दरम्यान ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. या चोरट्यांनी चक्क …

Read More »

खानापूर तालुक्यातील रस्त्यांच्या समस्यांबाबत तालुका समितीच्या वतीने निवेदन

  खानापूर : खानापूर तालुक्यातील खानापूर-अनमोड व्हाया हेम्माडगा रस्ता, खानापूर-असोगा-मणतुर्गे रस्ता, गर्लगुंजी-इदलहोंड रस्ता, लालवाडी-चापगाव-अवरोळी रस्ता, हलशी-हलगा-मेरडा-नागरगाळी रस्ता नव्याने पुनर्बांधणी करण्याबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आज दि. २३ जुलै रोजी खानापूर तहसीलदार प्रकाश गायकवाड तसेच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देण्यात आले. खानापूर-अनमोड व्हाया हेम्माडगा या रस्त्यावरुन गोव्याला जाणारी अवजड …

Read More »

खानापूर तालुक्यात वैद्यकीय सेवा आणि वाहतूक पायाभूत सुविधांचा अभाव: डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : केएलई हॉस्पिटलला नुकत्याच दिलेल्या भेटीने खानापूर तालुक्यातील सुधारित वैद्यकीय सेवा आणि वाहतूक पायाभूत सुविधांची नितांत गरज अधोरेखित केली. मंगळवारी डॉ. सरनोबत यांनी केएलई हॉस्पिटलमध्ये जाऊन खानापूर तालुक्यातील हर्षदा घाडी या महिलेची भेट घेऊन विचारपूस केली. या रुग्णाला आमगाव (ता. खानापूर) येथून अत्यंत गंभीर अवस्थेत बांबूच्या सहाय्याने तिरडीप्रमाणे …

Read More »