Monday , December 15 2025
Breaking News

कर्नाटक

हब्बनहट्टी अंगणवाडीला मदत!

खानापूर : बेळगावच्या आशा नाडकर्णी यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या हब्बनहट्टी या गावातील दुर्लक्षित अंगणवाडी शाळेला खुर्च्या, टेबल आणि खेळाच्या साहित्याची देणगी दिली. हब्बनहट्टी हे गाव खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलात वसले आहे. बेळगाव शहरापासून सुमारे 20 कि. मी. अंतरावर असलेले हे गाव बर्‍याच मूलभूत नागरी …

Read More »

हालसिद्धनाथ पाडवा यात्रेला भाविकांची गर्दी

चोख पोलिस बंदोबस्त : विविध धार्मिक कार्यक्रम कोगनोळी : हलसिद्धनाथ महाराज की जय चांगभलं च्या जयघोषात आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील हालसिद्धनाथ पाडवा यात्रेला हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शनिवार तारीख 2 रोजी कुर्ली येथील हालसिध्दनाथ मंदिरातून पालखी निघाली. वाडा मंदिरापासून कुर्ली आप्पाचीवाडी पालखी सवाद्य मिरवणूकीने खडक मंदिरात आणण्यात आली. …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीची 4 रोजी बैठक

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक २४ मार्च २०२२ रोजी तीर्थक्षेत्र स्वयंभू मारुती देवस्थान हब्बनहट्टी येथे संपन्न झाली. त्या बैठकीमध्ये म. ए. समितीच्या दोन्ही गटांची एकीची प्रक्रिया बिनशर्त पार पडली आहे, त्या दिवशी ठरल्याप्रमाणे सोमवार दिनांक ४ एप्रिल २०२२ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे बैठक …

Read More »

संकेश्वरात मुलांचा गुढी पाडवा उत्साहात….

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात सकाळी मराठी घरांमध्ये घराच्या गच्चीवर, घराबाहेर उंचच-उंच गुढी उभारून गुढी पाडवा सण उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये संकेश्वरातील छोटे मुले-मुली देखील कांही मागे पडली नाहीत. त्यांनी देखील आपल्या परीने गुढी उभारून गुढी पाडव्याचा आनंद द्विगुणित केला. येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर जवळ किरण खटावकर यांच्या निवासस्थानी …

Read More »

नागुर्डा-वाडा येथे संगीत भजनी स्पर्धा संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : परितोषक दवारकरी संप्रदाय समाजातील चातुर्वर्ण्य संस्कार नाकारणारा असून समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा मार्ग आहे. या संप्रदायांने आजवर समाजातील अनिष्ट प्रथा, रूढी, भेदभाव, जातीयता, अंधश्रद्धा लाथाडून सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा संदेश दिला आहे, असे विचार निरंजन सरदेसाई यांनी व्यक्त केले. नागुर्डा-वाडा(ता. खानापूर) येथे नुकताच संगीत भजनी …

Read More »

चिगुळे ग्रामस्थांचे तहसीलदाराना निवेदनाव्दारे १७ जणांवर कारवाईची मागणी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील चिगुळे येथील माऊली सेवा समितीच्या सदस्याना चिगुळेतील काही नागरिक धमकावुन गावात दहशत घालत आहेत. मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव करत आहेत. अशा चिगुळेतील १७ जणांवर कारवाई करावी. अशा मागणीचे निवेदन तहसीलदार प्रविण जैन व सीपीआय सुरेश सिंगे याना नुकतेच देण्यात आले. निवदेनात म्हटले आहे की, …

Read More »

सौंदलगा येथे ऐतिहासिक बुरुज संवर्धनासाठी युवकांकडून प्राधान्य

सौदलगा : सौंदलगा येथे ऐतिहासिक बुरुजाचे संवर्धन करण्यासाठी युवक वर्गाकडून प्राधान्य, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कामास सुरुवात. गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. सौंदलगा येथे भुईकोट किल्ला होता त्या किल्ल्याची पडझड झाली असून इतिहासाचा शेवटचा दुवा म्हणून एक बुरूज उभा आहे.त्या बुरुजाचे संवर्धन करणे व इतिहासाचा अमोल ठेवा जतन करणे सौंदलग्यातील युवावर्गाने ठरवले …

Read More »

कोगनोळी येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास संपन्न

कोगनोळी : येथील भगवा चौक येथे असणार्‍या पंत बाळेकुंद्री महाराज मंदिरात छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास संपन्न झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना युवराज पाटील म्हणाले, समस्त हिंदू धर्मीयांच्या वतीने 3 मार्च ते 1 एप्रिल (फाल्गुन अमावस्या) धर्मवीर छत्रपती …

Read More »

टोल दरवाढीचा वाहनधारकांना भुर्दंड

कोगनोळी : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने शुक्रवार तारीख १ च्या मध्यरात्रीपासून टोल दर वाढवण्यात आल्याने वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली असून टोल दरवाढीचा वाहनधारकांना मोठा भुर्दंड बसत असल्याचे दिसून येत आहे. कोगनोळी तालुका निपाणी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या टोलनाक्यावर येणाऱ्या …

Read More »

सिंगीनकोप शाळेत विद्यार्थ्यांना निरोप

खानापूर (प्रतिनिधी) : सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष धोंडीबा कुंभार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून इदलहोंड केंद्राचे सीआरपी गोविंद पाटील, सिंगीनकोप ग्राम पंचायत सदस्य परशराम कुंभार, माजी ग्राम पंचायत सदस्य कृष्णा कुंभार, तसेच …

Read More »