खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी परिसरातील गावाना गावोगावी रेशनवाटप करण्याची मागणी खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार प्रविण जैन यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जुन महिन्याच्या १८ तारखेला यासंदर्भात निवेदनात देऊन महिना झाला तरी अद्याप कोणतीच दखल घेतली नाही. …
Read More »ए. बी. पाटील यांचं उत्तर….?
संकेश्वर (महंमद मोमीन) : माजी मंत्री ए. बी. पाटील हे आगामी विधानसभा निवडणूक बेळगांव उत्तर मतक्षेत्रातून लढविणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगलेली दिसत आहे. याविषयी अद्याप तरी ए. बी. पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे ए. बी. यांचं उत्तर? काय असणार यांचे औत्सुक्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेले दिसत आहे. …
Read More »शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी गुरुवारी विधान सौधवर मोर्चा
राजू पोवार : शेतकरी मेळाव्याचेही आयोजन निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बेळगाव येथील विधानसभा गुरुवारी (ता.२१) मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर मेळावा होणार आहे. त्यामध्ये रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन चिकोडी जिल्हा रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पोवार यांनी केले आहे. येथील शासकीय विश्राम धामात …
Read More »खानापूर तालुका समितीतर्फे बेळगाव-पणजी महामार्गावर ठिय्या आंदोलन
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे बेळगाव-पणजी महामार्ग रोखून ठिय्या आंदोलन करण्यात आले. रामनगर-खानापूर रस्ता हा खड्डेमय झाला आहे. वेळोवेळी मागणी करून देखील या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. राष्ट्रीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून खानापूर तालुक्यातील जनतेच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. दि.7 जुलै रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे तहसीलदारांना …
Read More »सरकारने सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत
प्रशांत नाईक : राजेश क्षीरसागर यांची भेट निपाणी (वार्ता) : शिवसेनेचे नुतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आणि राज्य नियोजन मंडळाचे मंत्री राजेश क्षीरसागर यांच्या शिवालय या कोल्हापूरमधील बुधवारपेठेतील कार्यालयातील निपाणी येथील शिष्टमंडळाने भेट देऊन विविध विषयावर चर्चा केली. यावेळी निपाणीतील शिष्टमंडळातील प्रशांत नाईक आणि नवनाथ चव्हाण यांनी …
Read More »जीएसटी वाढ, विस्ताराचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन
बेंगळुरू : केंद्र सरकारच्या जीएसटी वाढवण्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज समर्थन केले. अनेक वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणल्याचा आणि जीएसटी वाढविल्याचा भार ग्राहकांवर पडणार नाही असा दावाही त्यांनी केला. सोमवारी विधानसौधमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क मुख्यमंत्री बोम्मई यांनी बजावला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बोम्मई म्हणाले, जीएसटी वाढ आणि …
Read More »प्रदूषणकारी एसबीओएफ खत कारखाना बंद करण्याची मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील नंजिनकोडल गावाजवळ असलेल्या साविओ बायो ऑरगॅनिक अँड फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड (एसबीओएफ) या खत कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्याकरिता हा कारखाना बंद करण्यात यावा आशा मागणीचे निवेदन नंजिनकोडल, दोड्डेबैल आणि सागरे ग्रामस्थांनी हलशी आणि नंजिनकोडल ग्राम पंचायतींना सादर केले. …
Read More »खराब रस्त्यामुळे गंगवाळी शाळेच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारासाठी करावा लागला 1 कि. मी. प्रवास
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा झाल्याने खानापूर-लोंढा महामार्गावरील गंगवाळी (ता. खानापूर) येथील प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्ता अतिशय खराब झाल्याने मध्यान्ह आहाराचे वाहन शाळेपर्यंत येऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनीच चक्क 1 किलोमीटरहून जास्त अंतर कापत माध्यान्ह आहार आणावा लागला. याची दखल घेत खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष …
Read More »ज्ञानाच्या प्रसादामुळे मन निर्मळ होते
प.पू. महेशानंद महास्वामीजी यांचे विचार; हंचिनाळमध्ये गुरुपौर्णिमा साजरी कोगनोळी : मस्तकाला तृप्त करणारा प्रसाद आणि मन तृप्त करणारा प्रसाद गुरुंच्याकडून मिळतो. गुरुंनी दिलेल्या ज्ञानाच्या प्रसादामुळे मन निर्मळ होते असे विचार प.पू. महेशानंद महास्वामीजी यांनी व्यक्त केले. हंचिनाळ के.एस (ता. निपाणी) येथील प.पू. ईश्वर महास्वामीजी भक्ती योगाश्रम मठामध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित …
Read More »बुदीहाळचे कृषी पंडित सुरेश पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार
निपाणी : भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या 94व्या स्थापना दिनानिमित्त बुदीहाळ ता निपाणी, जि. बेळगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री. सुरेश विश्वनाथ पाटील यांना ‘पंडित दीन दयाल अत्योंदय कृषी पुरस्कार’ देशाचे कृषी मंत्री श्री. नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta