Sunday , July 26 2026
Breaking News

हालसिद्धनाथ पाडवा यात्रेला भाविकांची गर्दी

Spread the love


चोख पोलिस बंदोबस्त : विविध धार्मिक कार्यक्रम
कोगनोळी : हलसिद्धनाथ महाराज की जय चांगभलं च्या जयघोषात आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील हालसिद्धनाथ पाडवा यात्रेला हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
शनिवार तारीख 2 रोजी कुर्ली येथील हालसिध्दनाथ मंदिरातून पालखी निघाली. वाडा मंदिरापासून कुर्ली आप्पाचीवाडी पालखी सवाद्य मिरवणूकीने खडक मंदिरात आणण्यात आली. मंदिर प्रदक्षिणा (सबिना) झाला भाविकांनी हेडाम खेळवले. मुर्तीची विधीवत पुजा करुन मुर्ती प्रतिष्ठापना केली.
सकाळी सात वाजता व रात्री सात वाजता आरती व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. रात्री ढोल जागर (वालंग), पहाटे पालखी प्रदर्शना काढण्यात आली.
रविवार तारीख 3 रोजी सकाळी सात वाजता मानकरी, पुजारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत आरती करून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सायंकाळी पालखी प्रदक्षिणा, पालखी वाडा मंदिर, कुरली पालखी रवाना या यात्रेची सांगता होणार आहे.
अनेक भाविकांनी दंडवत घातले. दिवसभर नैवेद्य देण्यासाठी आप्पाचीवाडी, कुर्ली येथील भाविकांनी गर्दी केली होती.
मंदिर परिसरात गर्दी होऊ नये म्हणून निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने पीएसआय अनिल कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
मंदिर परिसरात नारळ, साखर, कापूर, मेवामिठाई, हॉटेल, भेळ, आईस्क्रीम, पाळणे, खेळणी आधीचे स्टॉल थाटण्यात आले होते. ग्रामपंचायत प्रशासनाकडून येणाऱ्या भाविकांच्या साठी पिण्याचे पाणी व मंदिर परिसराची स्वच्छता आधी उपाय योजना करण्यात आल्या होत्या.
सौंदलगा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य सेविका अश्विनी पाटील काम पाहत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *