Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

कर्नाटकात लवकरच मुख्यमंत्री बदल!

आम.बसनगौडा पाटील यत्नाळ यांचा गौप्यस्फोट विजापूर : आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच खळबळ उडवून देणाऱ्या भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी कर्नाटकात लवकरच मुख्यमंत्री बदल केला जाईल असा नवा गौप्यस्फोट केला आहे. यासंदर्भात विजापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ म्हणाले, राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि मुख्यमंत्री बदलासंदर्भात भाजप पक्षश्रेष्ठी आणि …

Read More »

सभापती बसवराज होरट्टी यांचा भाजप प्रवेश!

बेंगळुरू : कर्नाटक विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बेंगळुरू येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गेल्या ३० वर्षांपासून जेडीएसशी असलेले घट्ट नाते तोडून त्यांनी …

Read More »

सौंदलगा येथील बहुउद्देश सेवा केंद्राच्या इमारतीचा स्लॅब भरणी शुभारंभ

सौंदलगा : सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पत्तिन संघास नाबार्डकडून मंजूर झालेल्या बहुउद्देश सेवा केंद्राच्या इमारतीचा स्लॅब भरणी शुभारंभ मंत्री शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पी.के. पी. एस. चे अध्यक्ष संजय शिंत्रे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात सांगितले की, नाबार्डकडून बेळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार्यातून आमच्या संघास बहूउद्देश …

Read More »

गर्लगुंजीत भंडार्‍याची उधळण करत लक्ष्मी, मर्‍याम्मा देवीच्या मुर्तीच्या मिरवणुकीला सुरूवात

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) गावच्या लक्ष्मी आणि मर्‍याम्मा मंदिराचा जीर्णोद्धार करून नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरात लक्ष्मी आणि मर्‍याम्मा देवींच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येत आहे. यानिमित्ताने मंगळवारी दि. 3 मे रोजी गावची ग्रामदेवता माऊली मंदिरापासून मुर्तीच्या मिरवणुकीला मंगळवारी पहाटेपासून वाद्याच्या तालावर व भंडार्‍याची उधळण करत गावच्या पंचाच्या व मानकर्‍यांच्याहस्ते …

Read More »

निपाणी शहर मध्यवर्ती रिक्षा संघटनेतर्फे शिव बसव जयंतीनिमित्त रिक्षा रॅली

निपाणी (वार्ता) : नरवीर तानाजी चौकातील शहर मध्यवर्ती रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे शिव बसव जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त प्रतिमापूजन व शहरातील विविध मार्गावरून रिक्षा रॅली काढण्यात आली. छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर यांच्याहस्ते झाले. तर मध्यवर्ती शिवाजी …

Read More »

’जय भवानी, जय शिवाजी’च्या गजरात निपाणीत शिवजयंती

दोन दिवसापासून शहर भगवेमय : शिवप्रेमींची अलोट गर्दी निपाणी (वार्ता) : कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासून शिवजयंती उत्सव यावर मर्यादा आल्या होत्या. पण या वर्षी संसर्ग कमी झाल्याने शिवजयंती उत्सव मंडळांनी सोमवारी (ता.2) विविध उपक्रमांनी धडाक्यात शिवजयंती साजरी केली. पहाटेपासूनच ’जय भवानी, जय शिवाजी’चा गजर सुरू होता. तर दोन दिवसापासून …

Read More »

कोगनोळी परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी

कोगनोळी : परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी, कुर्ली येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कोगनोळी तालुका निपाणी येथे सोमवार तारीख दोन रोजी सकाळी सात वाजता पारगगड येथून आणलेल्या शिवज्योतीचे भव्य स्वागत करण्यात आले. शिवज्योत गावातील प्रमुख मार्गावरून अंबिका मंदिर येथे आणण्यात आले. दुपारी बारा …

Read More »

संकेश्वरात जय भवानी, जय शिवाजीच्या गजरात शिवपुतळा चौथर्‍याची पायाखुदाई

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात जय भवानी, जय शिवाजीच्या गजरात राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या हस्ते शिवपुतळा चौथरा पायाखुदाई करण्यात आली. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानिू्ंसह भारती महास्वामीजींचे दिव्य सानिध्य लाभले. यावेळी बोलताना मंत्री उमेश कत्ती म्हणाले, संकेश्वरातील असंख्य शिवप्रेमींचे हिंदवी …

Read More »

वीरशैव लिंगायत होण्यासाठी लिंगदिक्षा हवी : डॉ. चन्नसिध्दराम महास्वामी

संकेश्वर (महंमद मोमीन) : लिंगायत कुटुंबात जन्मल्याने कोणी लिंगायत होत नाही. लिंगायत होण्यासाठी गुरुकडून लिंगदिक्षा घेण्याची आवश्यकता असल्याचे श्रीशैल्यचे डॉ. चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजींनी सांगितले. संकेश्वर श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये आयोजित नागमल्लीकार्जुन याच्या अय्याचार कार्यक्रमात सहभागी होऊन श्रींनी आर्शिवचन दिले. श्रींच्या दिव्य सानिध्यात चि.नागमल्लीकार्जुन यांचा अत्याचार आणि महेश्वर मंत्रोपदेश कार्यक्रम …

Read More »

खानापूर शिवबसवजयंती साजरी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील संत ज्ञानेश्वर मंदिरात मध्यवर्ती शिवबसव जयंती उत्सव यांच्यावतीने सोमवारी दि. २ रोजी सकाळी शिवबसवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या शिवसवजयंतीला भाजपच्या नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांची उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे …

Read More »