Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

संकेश्वरात श्री हनुमान जयंती भक्तीमय वातावरणात साजरी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील सर्वच श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासून श्री हनुमान मंदिरात दर्शनासाठी भक्तगणांंनी मोठी गर्दी केलेली पहावयास मिळाली. येथील श्री विठ्ठल मंदिरात पवनपूत्राच्या प्रतिमा पूजनाने जन्मोत्सव साजरा करण्यात आला. विनायक भागवत यांनी श्री मारुती प्रतिमेचै पूजन केले. भक्तगणांना प्रसाद स्वरुपात सुंठवडा …

Read More »

एक मुखाने बोला, जय जय हनुमान! निपाणीत हनुमान जयंती साजरी

धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात शनिवारी (ता.16) हनुमान जन्मोत्सवाची जय्यत तयार करण्यात आली होती. यानिमित्त विविध मंडळे, ट्रस्ट आणि मंदिर प्रशासनाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे सहा वाजल्यापासून अनेक मंदिरात ’एक मुखाने बोला, जय जय हनुमान’चा गजर सुरू होता. दिवसभर शहर …

Read More »

कर्नाटकात पुन्हा भाजपाची सत्ता : रमेश जारकीहोळी

संकेश्वर (प्रतिनिधी) : कर्नाटक विधानसभेची निवडणूक २०२३ मध्ये होत आहे. सदर निवडणुकीत भाजपच सरकार स्थापन करणार असल्याचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते शिवकृपा कार्यालयात बोलत होते. ते पुढे म्हणाले, कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा निर्विवाद बहुमत मिळविले यात तीळमात्र शंका नाही. सहा वर्षे भाजपाला चिंता …

Read More »

ईश्वरप्पा यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

लवकरच दोषमुक्त होण्याचा विश्वास, चाहत्यांच्या समर्थनार्थ घोषणा बंगळूर : ग्रामीण विकास व पंचायत राज खात्याचे मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी गुरूवारी घोषणा केल्याप्रमाणे आज (ता. १५) सायंकाळी सुमारे सव्वाआठ वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मंजूर केला आहे. ईश्वरप्पा यांच्यावर कंत्राटदार संतोष पाटील यांना आत्महत्या …

Read More »

कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्येमागे काँग्रेसचा हात! : प्रल्हाद जोशी

बेंगळुर : कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरण मागे काँग्रेसचा हात असून त्यांच्या हावभावावरून हि बाब निदर्शनास येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, मंत्री ईश्वरप्पा यांचा राजीनामा पक्षाने जड अंतःकरणाने स्वीकारला असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. विजापूर जिल्ह्यातील तोरवी येथे लक्ष्मी नरसिंह देवस्थानात दर्शनासाठी …

Read More »

डॉ. मुरगुडे यांना नेत्रसेवेने श्रध्दांजली

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे त्यांच्या धर्मपत्नी डॉ. श्वेता मुरगुडे, कन्या कु. सिया मुरगुडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा नेत्रसेवेचा वारसा आता हुबळी येथील एम.एम.जोशी नेत्र विज्ञान संस्था पुढे चालविणार असल्याचे कम्युनिटी इन्चार्ज संजय कुलकर्णी, कुतबुद्दीन मुल्ला (सीईओ) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. येथील डॉ. मुरगुडे इस्पितळात …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे स्वप्न साकारले : अ‍ॅड. प्रमोद होसमनी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिका आवारातील बागेला (गार्डनला) घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामकरण करण्यात आले पण पुतळा उभारण्याचे कार्य गेल्या कांही वर्षांपासून राहून गेले होते. शुक्रवार दि. 14 रोजी पुतळा उभारणेच्या कार्याचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांचे हस्ते करण्यात आल्याचे नगरसेवक अ‍ॅड. प्रमोद होसमनी यांनी सांगितले. नगराध्यक्षा सौ. …

Read More »

खानापूर मऱ्याम्मा देवीच्या मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या महाप्रसादाला हजारोंची उपस्थिती

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर पंचक्रोशीतील ग्रामदैवत मऱ्याम्मा देवीच्या इमारतीचा जिर्णोध्दार करून मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा व उद्घाटन सोहळ्यानिमित्त शुक्रवारी दि. १५ रोजी आयोजित महाप्रसादाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावून महाप्रसादाचा लाभ घेतला. खानापूर शहरातील ग्रामदैवत श्री मऱ्याम्मा देवीच्या मंदिराचा मुर्ती प्राणप्रतिष्ठाप्राणा व उद्घाटन सोहळ्यानिमित्त मंगळवारी दि. १२ पासुन विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला. मंगळवार दि. …

Read More »

बहुजन क्रांती मोर्चातर्फे रविवारी तालुकास्तरीय संमेलन

जरारखान पठाण : रॅलीचेही आयोजन निपाणी (वार्ता) : विखुरलेल्या बहुजन समाजाला एकत्रित आणण्याच्या उद्देशाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बहुजन क्रांती मोर्चा तर्फे रविवारी (ता.१७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांची जयंती, तालुका स्तरीय संमेलन आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी निपाणी व परिसरातील बहुजन समाजातील नागरिकांनी …

Read More »

खानापूरात भाजपच्यावतीने डॉ. आंबेडकर जयंती साजरी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी खानापूर मंडल यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी प्रकाश गावडे यांनी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले. यावेळी भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन पुजन करण्यात आले. …

Read More »