संकेश्वर (प्रतिनिधी) : मतिमंद मुलांच्या जिवनात आनंदाची बहार येऊ दे, त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, असे दैनिक मनध्वनीचे संपादक मंजुनाथ गड्डेण्णावर यांनी सांगितले. त्यांनी आपला वाढदिवस निपाणी येथील नितिशकुमार कदम यांच्या मतिमंद मुलांच्या वस्तीशाळेत उत्साही वातावरणात साजरा केला. यावेळी मंजुनाथ गड्डेण्णावर यांनी मतिमंद मुलांना केक बिस्कीट वाटप करुन त्यांना स्नेहभोजन दिले. …
Read More »संकेश्वर पालिकेला स्वच्छतेचा बहुमान कोणी दिला?
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेला स्वच्छतेचे दुसरे पुरस्कार मिळाल्याबद्दल नगरसेवकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परवा पालिकेच्या मासिक सभेत नगरसेवकांनी थेट मुख्याधिकारी जगदीश ईटी यांना संकेश्वर पालिकेला स्वच्छतेचा बहुमान कोणी दिला. असा प्रश्न विचारला.गावात स्वच्छतेच्या नावे लोकांत शिमगा सुरू असताना पालिका स्वच्छतेच पुरस्कार मिळविणारी ठरली आहे. गावात कोठेच स्वच्छता नसल्याचा …
Read More »सैन्यात भरती झालेल्या सिंगीनकोप शाळेच्या विद्यार्थ्यांचे स्वागत
खानापूर (प्रतिनिधी) : सैन्यात भरती होऊन देशाचे संरक्षण करून आलेल्या सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेचा विद्यार्थी सिध्देश्वर केप्पना मादीहाळ हा भारतीय सैन्यातील आयटीबीपीमध्ये भरती होऊन देशाच्या बाॅर्डवर सेवा बजावून प्रथमच आपल्या सिंगीनकोप गावी शनिवारी आला. त्यानिमित्ताने सिंगीनकोप पूर्व प्राथमिक मराठी शाळेत भारतीय सैनिकाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात …
Read More »खानापूर कृषी खात्याच्यावतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : जिल्हा कृषी खाते आणि खानापूर तालुका कृषी खात्याच्या वतीने खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला मार्गदर्शन व सत्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी तज्ञ डॉ. एस. एस. हिरेमठ, डॉ. आर. बी. सुतगुंडी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. खानापूर तालुका कृषी अधिकारी डी. बी. …
Read More »संकेश्वरात मानसिक त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर नवी गल्ली येथील युवक शिवानंद राजू शिडल्याळी (वय २३) यांनी मानसिक त्रासाला कंटाळून आज गौरी ओढ्यातील वृक्षाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शिवानंद मानसिक त्रासाने अस्वस्थ होता. त्यातच त्याला फिटस आजाराने बेजार केले होते. तो सध्या येथील आझाद रस्ता इंद्रभवन …
Read More »खानापूर ता. पं. कार्यालय कार्यनिर्वाहक अधिकारीविनाच
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीचा कार्यभार सांभळणारे तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी पद गेल्या काही महिण्यापासून रिक्तच आहे. त्यामुळे तालुका पंचायत कार्यालयाबरोबरच तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे तालुका पंचायत कार्यालयातील कामकाज तसेच ग्राम पंचायत कार्यालयातील कामकाज ग्राम पंचायतीच्या हद्दीतील नागरिकांची गैर सोय होय. खानापूर …
Read More »निपाणीत चोरट्यांचे डेरिंग वाढले; पोलीस अधिकाऱ्यासह माजी सैनिकाचे घर फोडले
निपाणी : निपाणी शहर उपनगर व परिसरात गेल्या तीन महिन्यापासून घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी चोरट्यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांचे घर फोडून रक्कम व ऐवज लांबवला. याशिवाय अन्य दोन ठिकाणी घरफोडी झाली असून यामध्ये माजी सैनिकाच्या घराचाही समावेश आहे. गेल्या तीन महिन्यात निपाणी शहर व उपनगरात 40 घरफोड्या झाल्या आहेत. …
Read More »खानापूर तालुका म. ए. समितीत एकीची वज्रमुठ!
4 एप्रिलपासून पुनर्रचना प्रक्रिया सुरू खानापूर : खानापूर तालुक्यातील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मंदिरात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटात एकी घडली. गुरुवारी झालेल्या दोन्ही गटांच्या संयुक्त बैठकीत एकी करण्याचा निर्णय झाला असून 4 एप्रिल रोजी खानापूर शिवस्मारकात बैठक होणार असून त्या बैठकीपासून पुनर्रचनेला सुरुवात होणार …
Read More »हिजाब वाद; तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
बंगळूर : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. २४) पुन्हा एकदा कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणीसाठी विशिष्ट तारीख देण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाने इस्लामिक विश्वासातील अत्यावश्यक धार्मिक प्रथेचा भाग नसल्याबद्दल वर्गात हिजाब घालण्यावर बंदी कायम ठेवली होती. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या …
Read More »संकेश्वरात २ तास पाण्याला २४ तास ऐसे नाव…
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिका सभागृहात आयोजित सभेत पाणीपट्टी जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी यांनी भूषविले होते. ७ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या मासिक सभेत सर्व २८ सदस्यांनी संकेश्वरकरांची नळपाणी पट्टी वर्षाकाठी २ हजार रुपये ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेऊन तसा ठरावही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta