ॲड.असीम सरोदे, डॉ. स्वप्नील चौधरी, डॉ. कपिल राजहंस यांचा सहभाग निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात गेल्या २८ वर्षांमध्ये सातत्याने सामाजिक परिवर्तनाच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून निरंतरपणे बहुजन समाजातील तरुणांच्यात सामाजिक समतेच्या विचारांची बीजे रोवण्याचे काम सातत्याने सुरू आहे. खऱ्या अर्थाने समाज गुण्या गोविंदाने राहुन जात, पंत, धर्म, भाषा भेद …
Read More »सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची बैठक घेऊन निर्णय घ्यावा
मराठी भाषिकांची मागणी : निपाणीत आमदार क्षीरसागर यांच्याशी मराठी भाषिकांची चर्चा निपाणी (वार्ता) : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून पुढील वर्षापासून यासंदर्भात सलग सुनावणी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. याबाबत २१ जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार …
Read More »तालुका समितीच्या वतीने नंदगड भागात महामेळाव्यासंदर्भात जनजागृती!
खानापूर : 2004 साली सीमाप्रश्नाचा खटला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. त्यानंतर कर्नाटक सरकारने बेळगाववर आपला हक्क दाखविण्यासाठी 2006 पासून कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगावात भरून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत आहे. कर्नाटक सरकारच्या या कृतीला विरोध म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी मराठी भाषिकांच्या …
Read More »खानापूर शहरांतर्गत रस्त्याचा विकास आराखड्यानुसारच!
आमदार विठ्ठल हलगेकर यांची वकील संघटनेच्या शिष्टमंडळाला ग्वाही! खानापूर : खानापूर शहरांतर्गत जाणाऱ्या 14 कोटीच्या रस्त्याच्या विकासाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पण या रस्त्याचे काम आराखड्यानुसार होत नसल्याचा दावा सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रातून खानापूर तालुका वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. याची दखल घेऊन आमदार विठ्ठल हलगेकर …
Read More »पंच गॅरंटी योजनेमळे कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावला
पंच गॅरंटी योजनेच्या शिबिराला मोठी उपस्थिती, विविध मान्यवरांची उपस्थिती. नंदगड : कर्नाटक सरकारने अडीच वर्षांपूर्वी निवडणुकीच्या वेळी पंच गॅरंटी योजना जनतेसाठी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने गृहलक्ष्मी, गृहज्योती, अन्नभाग्य, शक्ती योजना, युवा निधी आदी पंच गॅरंटी योजना सुरू केल्या. आत्तापर्यंत साधारणता सर्वच …
Read More »बागलकोटमध्ये भीषण अपघात; ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकून कारमधील चौघांचा जागीच मृत्यू
बागलकोट : बागलकोट जिल्ह्यात सिद्धापूर गावाजवळ काल रात्री भरधाव वेगात आलेल्या एका कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमध्ये असलेल्या विश्वनाथ कंबार (१७), प्रवीण शेडबाळ (२२), गणेश अळ्ळीमट्टी (२०) आणि प्रज्वल शेडबाळ (१७) या चौघा दुर्देवी तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृत तरुण …
Read More »लोंढा अरण्य खात्यातर्फे रवळनाथ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वनदर्शन
खानापूर : श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था संचलित श्री रवळनाथ हायस्कूल, शिवठाण येथील विद्यार्थ्यांना लोंढा अरण्य विभाग व कर्नाटक सरकार यांच्या चिन्णर वनदर्शन अंतर्गत करंबळ ट्री पार्क, राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालय व हेमडगाव सदाहरित जंगलाला शैक्षणिक भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी जैवविविधता, लायकेन-शेवाळे, सदाहरित जंगलाची वैशिष्ट्ये व वन्य प्राण्यांच्या पाऊलखुणांचा प्रत्यक्ष अभ्यास …
Read More »येडियुरप्पा यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
पोक्सो प्रकरणातील खटल्याला स्थगिती बंगळूर : माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना पोक्सो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला आहे. येडियुरप्पा आणि इतर चार आरोपींनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश स्थगित केला. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर …
Read More »काँग्रेसमधील सत्ता वाटपाचे वाद निवळले?
सिद्धरामय्या–शिवकुमार यांची दुसरी ‘नाश्ता बैठक’ बंगळूर : काँग्रेसमधील सत्तावाटपाचा वाद कमी झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आठवड्यातील दुसऱ्या ‘नाश्ता बैठकी’त उपस्थित राहून पुन्हा ऐक्याचे दर्शन घडवले. सदाशिवनगर येथील शिवकुमार यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांनी आज सकाळी एकत्र नाश्ता करत राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा केली. …
Read More »विज्ञानामुळेच विविध क्षेत्रात क्रांती : आमदार महांतेश कवठगीमठ
बागेवाडी महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : देश आणि समाजाच्या प्रगतीसाठी विज्ञान कारणीभूत ठरले आहे. आरोग्याच्या व्याधी विज्ञानाच्या प्रगतीमुळेच कमी करणे शक्य झाले आहे. कोरोना काळातही विज्ञानाने केलेल्या कामगिरीमुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. शिवाय रस्ते, वाहतूक, कमी वेळेत प्रवास शक्य झाला आहे. तसेच विज्ञानामुळे कृषी क्षेत्रातही क्रांती झाली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta