बेंगळूर : राज्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरु आहे. शासनाच्या लसीकरण केंद्रांवर मोफत लसीकरण सुरु असून खासगी रुग्णालयांमध्ये शुल्क आकारून लसीकरण केलं जात आहे. दरम्यान, कर्नाटकमधील खासगी रुग्णालयात लसीकरणाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून खासगी रुग्णालयांनी मात्र लसीकरणाच्या सेवा शुल्कात वाढ करण्याची मागणी केली आहे. दरम्यान कोल्ड चेन, स्टोरेज आणि …
Read More »सोशल मीडियासाठीच्या नव्या नियमावलीमुळे लोकांनी घाबरू नये; केंद्रानं मांडली भूमिका
केंद्र सरकारने डिजिटल माध्यमांसाठी लागू केलेल्या नियमावलीविरोधात व्हॉट्सअॅपने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सरकारच्या नियमामुळे गोपनीयतेचा भंग होईल, असा दावा व्हॉट्सअॅपने केला आहे. त्यावर व्हॉट्सअॅपचा हा दावा केंद्र सरकारने बुधवारी फेटाळला. या नियमामुळे व्हॉट्सअॅपच्या वापरावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले. डिजिटल माध्यमांसाठी लागू केलेली नियमावली सोशल …
Read More »बुध्दपोर्णिमा : कोरोना संकटात गौतम बुध्दांनी दिलेल्या शिकवणीचा मोठा आधार : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : बुध्दपोर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला संबोधित केलं. ते म्हणाले, कोरोना संकट काळात गौतम बुध्दांनी दिलेल्या शिकवणीचा मोठा आधार आहे. निसर्गाचा आदर करणं, ही बुध्दांनी दिलेली शिकवण महत्वाची आहे. बुध्दांची तत्वे दीपस्तंभासारखे आहेत. कोरोनामुळे देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. आज संपूर्ण देश संकटात आहे. या काळामध्ये …
Read More »तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या पालकांनी घाबरु नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनाही …
Read More »‘यास’ चक्रीवादळ पुढच्या 24 तासात बंगालला धडकणार
रत्नागिरी : ‘तौक्ते’ चक्रीवादाळानंतर आता समुद्रकिनारी भागात ‘यास’ चक्रीवादळ येऊन धडकले आहे. बंगालच्या उपसागरात गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची संकेत हवामान खात्याने दिले आहेत. 25 मे पर्यंत ‘यास’ चक्रीवादळाची तीव्रता वाढून ते अतितीव्र चक्रीवादळात रुपांतरीत होणार आहे. म्हणजेच येथे …
Read More »कर्मचार्यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे पूर्ण वेतन, घर आणि मुलांचे शिक्षण विनामूल्य, सर्व खर्च टाटा उचलणार!!
नवी दिल्ली – कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. कोरोनामुळे देशात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. यात अनेकांनी आपले आई-वडील, आजी-आजोबा तर कुणी आपले भाऊ-बहीण गमावले आहेत. अनेक मुलं अनाथ झाली आहेत. अशात त्यांना दिलासा देण्यासाठी कॉरपोरेट कंपन्या विविध प्रकारचे प्रयत्न करत आहेत. यातच टाटा स्टीलने अशा लोकांसाठी मोठी घोषणा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta