बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिव्हाळा या फाउंडेशनतर्फे जुने बेळगाव येथील महानगरपालिकेच्या निवारा केंद्राच्या आवारात 25 वेगवेगळ्या फळांच्या रोपांची लागवड करण्यात आली. महानगरपालिकेच्या कमिशनर के. एच. जगदीश यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. श्री. जगदीश यांनी निवारा केंद्राबद्दल माहिती सांगितली व जिव्हाळा संस्थेच्या कार्याबद्दल प्रशंसा केली. जिव्हाळ्याच्या संस्थापिका …
Read More »जिव्हाळा फाउंडेशनतर्फे आगळा वेगळा फादर्स डे
बेळगाव : जिव्हाळा फाउंडेशनतर्फे नावगे येथील करुणालय वृद्धाश्रमात फादर्स डे साजरा करण्यात आला. यावेळी जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने वृद्धाश्रमातील सदस्यांना मिठाई आणि राशनचे वाटप करण्यात आले.अनिता रॉड्रीक्स यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि करुणालय वृद्धाश्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. जिव्हाळा संस्थेच्या अध्यक्षा सौ. माधुरी जाधव आणि उपाध्यक्ष डॉ. राजश्री अनगोळ यांनी जिव्हाळा संस्थेबद्दल …
Read More »भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्यावतीने योग दिन साजरा
बेळगाव : विश्व योग दिनानिमित्त भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्यावतीने बेळगाव ग्रामीण मंडळमध्ये उचगाव, कर्ले, के. के. कोप, तारिहाळ अशा 4 ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलतांना भाजपा बेळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष श्री. संजय पाटील म्हणाले, योग ही आपल्या देशाची देणगी आहे. आज विदेशी डे आपण साजरे करतो. …
Read More »खानापूर व बेळगाव तालुक्यातील विजेच्या समस्यांबाबत निवेदन
बेळगाव : बेळगाव व खानापूर तालुक्यातील वीज पुरवठ्यासंदर्भात असणाऱ्या विविध समस्या सोडवा, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती व बेळगाव तालुका म. ए. समिती युवा आघाडीच्यावतीने हेस्कॉम अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.खानापूर व बेळगाव तालुक्यातील समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी संयुक्तपणेहेस्कॉमचे अधिकारी श्रीधर गुडीमनी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी …
Read More »सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला मतिमंद मुलाला आधार!
बेळगाव : जुना पी. बी. रोड येथे गेल्या काही दिवसापासून एक मतिमंद मुलगा नाल्याच्या पाईपमध्ये रहात होता ही माहिती हेल्प फॉर नीडी ऑटो अम्ब्युलन्सचे अध्यक्ष गौतम कांबळे आणि जिव्हाळा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. माधुरी जाधव पाटील यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्या मुलाला आधार मिळवून देण्याकरिता त्याची विचारपूस करण्यासाठी …
Read More »ताराराणी हायस्कूलचे शिक्षक एस. एन. पाटील यांचे निधन
खानापूर (प्रतिनिधी) : निडगल (ता. खानापूर) गावचे सुपुत्र व ताराराणी हायस्कूलचे सहशिक्षक एस. एन. पाटील (वय ५१) यांचे रविवारी दि. २० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, बहिण असा परिवार आहे.
Read More »एससी /एसटी तसेच ओबीसी प्रवर्गातील कोविड मृतांच्या वारसांना मिळणार आर्थिक मदत
बेळगाव : कोविड -१९ मुळे मृत्यू झालेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाईल, असे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा दंडाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले. कोविड -१९ संक्रमणाच्या दुसर्या लाटेत बेळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाने मृत झालेल्या अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या कुटुंबियांना, एम एफ एस …
Read More »मार्कंडेय नदीत वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला
बेळगाव : तीन दिवसांपूर्वी काकती पुलाजवळ मार्कंडेय नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह सापडला आहे. काकतीच्या पुलापासून ३ कि.मी. वर असलेल्या दर्गा पुलाजवळ हा मृतदेह सापडला. एसडीआरएफ, अग्निशमन दल आणि वाल्मिकी युवा संघटनेच्या कार्यकर्त्यानी सलग तीन दिवस शोधमोहीम राबवली होती अखेर आज या शेतकऱ्याचा मृतदेह हाती लागला. यावेळी कुटुंबीयांचा शोक …
Read More »खानापूरात पाऊस ओसरला, नदी पात्रातील पाणी घसरले
खानापूर (प्रतिनिधी) : अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखणाऱ्या खानापूर तालुक्यात गेल्या पाच दिवसापासुन खानापूर शहरासह तालुक्यात पावसाने थैमान घातल्याने तालुक्यातील नदी, नाले, तलाव दुथडी भरून वाहत होते.रविवारी सकाळपासुन खानापूरसह तालुक्यात ऊन पाऊस असा लपंडाव खेळ सुरू होता. त्यामु़ळे रविवारी दुपारपर्यंत पावसाची उघडीप होती. काही वेळ ऊन पडले होते.खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी …
Read More »पित्यासह दोन मुलींची गळफास घेऊन आत्महत्या
चिक्कोडी : पत्नीच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसल्याने पती आणि दोन तरुण मुलींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना चिकोडी तालुक्यातील पोगत्यानट्टीमध्ये घडली आहे. या संबंधी मिळालेली माहिती अशी कि, बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील पोगत्यानट्टी गावातील चन्नव्वा रंगापुरे (वय ४०) या महिलेचे गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. हा धक्का …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta