Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

१३ जलतरणपटूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : म्हैसूर येथे ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत स्विमर्स क्लब व अ‍ॅक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या जलतरणपटूंनी अभूतपूर्व यश मिळवत ९ सुवर्ण, १४ रौप्य व १९ कांस्य असे ४२ पदके जिंकली. या चमकदार कामगिरीच्या बळावर १३ जलतरणपटूंची राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली …

Read More »

आमदार आसिफ सेठ यांचा मुख्यमंत्र्यांसोबत दिल्ली दौऱ्यात सहभाग

  बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ अधिकृत प्रतिनिधीमंडळासह नवी दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कॅबिनेट मंत्री बी. झेड. झमीर अहमद खान यांच्यासोबत त्यांनी कर्नाटकातील विकास प्रकल्प, प्रशासकीय समन्वय आणि कल्याणकारी योजनांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा केली. या बैठकीत मंजूर प्रकल्पांना निधी व प्रशासकीय मंजुरी, विभागीय अंमलबजावणीतील …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलच्या ‘ज्योतिर्मयी’ मॅगझिनचे प्रकाशन उत्साहात

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे आज शाळेच्या पहिल्या ‘ज्योतिर्मयी’ नामक शालेय मॅगझिनच्या पहिल्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शालेय जीवनातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या साहित्यिक विचारांना व्यासपीठ देण्यासाठी हे नियतकालिक सुरू करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि …

Read More »

कंग्राळ गल्ली येथील जिजाऊ महिला मंडळाचा दीपोत्सव उत्साहात

  बेळगाव : कंग्राळ गल्ली येथील जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने गल्लीतील श्री वेताळ देवस्थान व श्री बसवाना देवस्थान येथे दीपोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. सुरुवातीस अदिती पवार, प्रीती पाटील, मेघना पाटील यांनी मंदिरांसमोर सुंदर रांगोळी रेखाटली. कुमारी ज्योती सुतार हिने दीपोत्सवाबद्दलची माहिती सांगितली. दिव्यांच्या ज्ञानरूपी प्रकाशाने अज्ञानरूपी अंधकार दूर व्हावा …

Read More »

मंत्रिमंडळ विस्तार आमच्या हातात नाही : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : मंत्रिमंडळाचा विस्तारही आमच्या हातात नाही. अशा बाबींवर वरिष्ठ निर्णय घेतात. ते नेतृत्वातील गोंधळाचे निरीक्षणही करत आहेत. त्यांनी स्वतः हे स्पष्ट केले तर बरे होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले. केपीसीसी अध्यक्ष होण्याच्या चर्चेबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना सतीश जारकीहोळी म्हणाले की, राज्यात ६ कोटी लोक …

Read More »

भुतरामनहट्टी राणी कित्तुर चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात आणखी एका हरणाचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील भुतरामनहट्टी राणी कित्तुर चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात आणखी एका हरणाचा मृत्यू झाला. प्राणीसंग्रहालयातील मृत हरणांचा आकडा २९ वर पोहोचला आहे. १३ नोव्हेंबर रोजी भुतरामनहट्टी राणी कित्तुर चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात ८ हरणांचा मृत्यू झाला. काल एकाच दिवसात २० हरणांचा मृत्यू झाला. आज आणखी एका हरणाच्या मृत्यूमुळे चिंता निर्माण झाली …

Read More »

शिबिरार्थीना भविष्यासाठी समुपदेशनाची नितांत गरज : विक्रम पाटील

  बेळगाव : कॅपिटल वन तर्फे शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत सलग 17 व्या वर्षी अयोजीत करण्यात आलेल्या एस्. एस्. एल्. सी. व्याख्यानमालेच्या उदघाटनाचा सोहळा रविवार दि. १६/११/२०२५ रोजी ज्योती महाविद्यालय, कॅम्प, बेळगाव, येथे नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव श्री. विक्रम पाटील यांनी दहावीच्या विध्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी आयोजित २५ वे रौप्यमहोत्सवी मराठी बाल साहित्य संमेलन उत्साहात

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने रौप्य महोत्सवी मराठी बाल साहित्य संमेलन बालसाहित्यिक साहित्यप्रेमी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. बेळगावसह परिसरातील विद्यार्थ्यांनी या संमेलनात सहभाग घेतला होता. संमेलनाची सुरुवात विद्यानिकेतन शाळेच्या ग्रंथालयापासून निघालेल्या भव्य पुस्तक दिंडीने झाली. संमेलनाध्यक्ष प्राध्यापक मृणाल पर्वतकर यांनी विद्यानिकेतन शाळेतील …

Read More »

बेळगाव दक्षिण व बेळगाव तालुक्यात उद्या वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : वीज विभागाच्या नियोजित देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे बेळगाव दक्षिण विभागासह बेळगाव तालुक्यात उद्या (रविवार, दि. 16) सकाळी 10 ते सायं. 4 वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. हेस्कॉमकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुख्य लाईनचे बळकटीकरण, दुरुस्त्या, ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स, झाडांच्या फांद्या कापणे, उपकरणांची तपासणी या कारणास्तव वीजपुरवठा ठप्प करण्यात येणार …

Read More »

काव्यशेकोटी संमेलन – 2025 : नवोदित कवींना सुवर्ण संधी!

  बेळगाव (प्रतिनिधी) : शब्द, निसर्ग आणि भावना यांच्या संगमात नटलेली काव्यप्रतिभा सादर करण्याची सुवर्णसंधी नवोदित कवींसाठी उपलब्ध झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद – कोल्हापूर यांच्या सौजन्याने, तसेच सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “काव्यशेकोटी संमेलन – 2025” हा भव्य आणि बहारदार काव्योत्सव रविवार, दि. 30 नोव्हेंबर 2025 रोजी …

Read More »