Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

येळ्ळूर येथील जलजीवन पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात

बेळगाव : येळ्ळूर गावामध्ये चालू असलेल्या जलजीवन 24/7 पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येळळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत या कामाची कटाक्षाने पाहणी केली. यावेळी झोन 4 आणि 5 मधील रामदेव गल्लीपासून विराट गल्ली येळळूरपर्यंत पाहणी करताना बऱ्याच ठिकाणी पाणी येत नाही, प्रेशर …

Read More »

अन्नधान्यवर लादण्यात आलेल्या जीएसटीचा ‘आप’कडून निषेध

  बेळगाव : अन्नधान्यावर लादण्यात आलेल्या जीएसटीच्या निर्णयाच्या विरोधार्थ आज बेळगावमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात आज आम आदमी पार्टीच्या बेळगाव विभागातर्फे आंदोलन छेडण्यात आले. दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, दूध, ताक, दही यावर लादण्यात आलेल्या जीएसटीचा निषेध करत सदर निर्णय सरकारने मागे घ्यावा, …

Read More »

बिम्स रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू

  डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बालक दगावल्याचा पालकांचा आरोप बेळगाव : बिम्स रूग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी बिम्स रूग्णालयासमोर डॉक्टरांच्या विरोधात संताप व्यक्त केला. होन्निहाळ गावात राहणार्‍या सुनीता यांना आठ दिवसांपूर्वी प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. दरम्यान, कुटुंबीय …

Read More »

बँक ऑफ बडोदामध्ये स्थापना दिवस साजरा

  बेळगाव : बेळगाव येथील बँक ऑफ बडोदामध्ये स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम रामदेव गल्लीतील बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सिनियर ब्रँच मॅनेजर, ब्रँच मॅनेजर तसेच बँक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सुरेश कुरेन्नावर सिनियर ब्रँच मॅनेजर, प्रदीप शिंदे, बाळा बाळतीमल्हा, आनंद सुगटे, सौ. दुर्गा चौगुले, …

Read More »

पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई द्यावी : शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बेळगाव : लेंडी नाला व बेळ्ळारी नाल्यातील जलपर्णी काढून नाला पूर्णपणे स्वच्छ करावा तसेच पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. लेंडी नाला व बेळ्ळारी नाला वर्षानुवर्षे विकासापासून दुर्लक्षित आहे. अनेकदा मागणी करून देखील या नाल्याची साफसफाई करण्याची तसदी स्थानिक प्रशासनाने घेतलेली नाही. …

Read More »

बेळगाव-सांबरा रस्ता होणार सहा किंवा चौपदरी

  बेळगाव : रायचूर-बाची राज्य महामार्गावर येणार्‍या बेळगाव-सांबरा रस्त्यादरम्यान सहा पदरी किंवा चौपदरी रस्ता बांधकामासंदर्भातील योजनेवर स्वतंत्रपणे चर्चा करून तातडीने मंजूर करण्यात येईल, असे जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले. कर्नाटक विकास कार्यक्रम अर्थात केडीपीची पहिली तिमाही बैठक आज मंगळवारी सुवर्ण विधान सौध येथे घेण्यात आली. प्रगती आढावा बैठकीच्या …

Read More »

दुसऱ्या रेल्वे रुळाशेजारील भिंत कोसळण्याच्या मार्गावर!

  बेळगाव : दुसर्‍या रेल्वेगेटजवळील रेल्वे रुळाशेजारील भिंत कलली असून, ती कधीही कोसळण्याचा मार्गावर आहे. यामुळे या ठिकाणाहून जाणार्‍या येणार्‍या नागरिकांना आणि रेल्वेलाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ही भिंत सुमारे सहा महिन्यापूर्वीच बांधण्यात आली आहे. दुसर्‍या रेल्वे गेट टिळकवाडीकडे जाणार्‍या रस्त्याच्या डाव्या बाजूला रेल्वेचे रेडिमेड कुंपण एका बाजूला …

Read More »

श्री कच्छ कडवा पाटीदार सनातन समाज आयोजित मातृ – पितृ वंदना कार्यक्रम

  बेळगाव : श्री कच्छ कडवा पाटीदार सनातन समाज बेळगाव यांचे वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठांचा सन्मान हा या कार्यक्रमाचा मुख्य गाभा होता. कच्छमध्ये गावातील वरिष्ठ जोडप्यांचा आणि नागरिकांचा सन्मान करण्याची प्रथा आहे त्याला अनुसरून बेळगावात प्रथमच वरिष्ठ अशा 49 जोडप्यांचा सत्कार करण्याचा अनोखा आणि अनुकरणीय उपक्रम …

Read More »

बैलहोंगल येथे कारला दुचाकीची धडक; मुलाचा मृत्यू

  बैलहोंगल : सौंदत्ती रोडवरील जालिकोप्पजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याने एका मुलाचा मृत्यू झाला. चिवटगुंडी गावातील संदिप सिद्धप्पा मल्लुर (11) असे मृत मुलाचे नाव आहे. दुचाकीस्वार इराप्पा चन्नाबसप्पा बगनाळ (३२) आणि पाठीमागून आलेले शिवाप्पा बसवंतप्पा मल्लूर हे दोघे धारवाडहून बैलहोंगलकडे येत असताना बैलहोंगल ते कित्तूरकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारला धडक बसली. …

Read More »

पशु संजीवनी रुग्णवाहिकांचे उद्घाटन

  बेळगाव : शेतकरी आणि पशुपालकांच्या सोयीसाठी बेळगाव विभागातील 7 जिल्ह्यांसाठी 87 सुसज्ज पशु संजीवनी रुग्णवाहिकांचे उद्घाटन पशुसंवर्धन मंत्री प्रभू चव्हाण आणि जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते करण्यात आले. बेळगाव सुवर्णसौध येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री प्रभू चव्हाण आणि गोविंद कारजोळ यांच्यासह जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि इतर अधिकारी तसेच …

Read More »