Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

पीक व घरांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून भरपाई देण्यात येणार

  पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची सुचना बेळगाव : नुकत्याच झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या पिकांचे व घरांच्या नुकसानीचे अचूक सर्वेक्षण करून तातडीने कार्यवाही करावी, अशा कडक सूचना जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. भरपाई देण्यासाठी घेतले. चिक्कोडी येथे आज सोमवारी अतिवृष्टी आणि पुराच्या पूर्वतयारीसंदर्भात आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानी होते. …

Read More »

अतिरिक्त शिक्षकांच्या बदलीसाठी कौन्सिलिंगचे वेळापत्रक लवकरच जाहीर

  बेळगाव : शिक्षण खात्याने राज्यात 15 हजार शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी शिक्षण खात्याने सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार किती शिक्षकांनाही गरज आहे याचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचप्रमाणे अतिरिक्त शिक्षकांची माहिती जमा करण्यात आली असून अतिरिक्त शिक्षकांच्या बदलीसाठी कौन्सिलिंगचे वेळापत्रक लवकरच जाहीर …

Read More »

अथणीत आढळले दुर्मिळ रानमांजर

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात दुर्मिळ रानमांजर आढळल्याने खळबळ माजली आहे. वन खात्याच्या अधिकार्‍यांनी त्याला ताब्यात घेऊन जंगलात सोडले. बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात काल, रविवारी रात्री रानमांजर सदृश्य प्राणी आढळल्याने खळबळ माजली आहे. काही स्थानिक रहिवाशांनी त्याला बिबट्याचे पिल्लू असल्याचे म्हटले. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, याची माहिती …

Read More »

येळ्ळूर येथे दरवर्षीप्रमाणे दहीकाला संपन्न

  बेळगाव : आषाढी एकादशीची पंढरपूर वारी संपवून वारकरी गावामध्ये आल्यानंतर दहीकाला कार्यक्रम आयोजित केला जातो. ही दहीहंडी गावातील हक्कदार यांच्या घरातून वाजत गाजत श्रीहरी विठ्ठलाच्या जयघोषात आनंदाने श्री चांगळेश्वरी मंदिरकडे आणले जाते व मंदिरसमोर सर्वांच्या उपस्थित दहीकाला हंडी मानाच्या लाकडाच्या ओडक्याला बाधून सभोवती फिरवली जाते व गावातील नागरिकांच्यावतीने दहीहंडी …

Read More »

जिथे संस्कार तिथे संस्कृती : आपटे

गणेशपूर संत मीरा शाळेत गुरुपौर्णिमा साजरी बेळगाव : जिथे संस्कार असतात, तिथे संस्कृती नांदत असते. प्रगती होत असते. जिथे विकृती असते तेथे अधोगती असते. जीवनात अनेक टप्प्यावर मार्गदर्शन करणारे गुरु भेटत असतात. आपले आईवडील पहिले गुरु असतात, असे विचार ज्येष्ठ पत्रकार सुनील आपटे यांनी व्यक्त केले. गणेशपूर येथील संत मीरा …

Read More »

रयत गल्लीतील घराची भिंत कोसळली

बेळगाव : मुसळधार पावसाने रयत गल्ली मा.वडगाव येथील विधवा महिला निता विवेक डोंगरे यांच्या घरची भिंत रविवारी दुपारी कोसळल्याने घराचे छप्पर जमीनीवर पडले आहे. सुदैवाने त्या व त्यांची मुलं घरात नसतानां ही घटना घडल्याने अनर्थ टळला. या कुटुंबाला मदत करण्याची गरज व्यक्त होत आहे

Read More »

शाहुनगरात डेंग्यू व चिकुनगुनिया लसीकरण शिबीर

  बेळगाव : शाहुनगर, बेळगाव येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि अंबिका महिला मंडळांच्यावतीने मोफत डेंग्यू व चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले. पाटील बिल्डिंग, शिवबसव मार्ग, शाहुनगर, बेळगाव येथे आज, रविवारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि अंबिका महिला मंडळांतर्फे मोफत डेंग्यू आणि चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण …

Read More »

पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर स्मृती वक्तृत्व स्पर्धा संपन्न

  बेळगाव : बेळगाव येथील एल्गार सामाजिक साहित्य परिषद यांच्या वतीने बेळगावातील प्रसिद्ध पुस्तकप्रेमी आणि पुस्तक संग्राहक शंकर चाफाडकर यांच्या पाचव्या स्मृतिदिन प्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन रामदेव गल्ली, बेळगाव येथील गिरीश कॉम्प्लेक्शच्या शहीद भगतसिंग सभागृहात रविवार दि. १७ जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडल्या. वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एल्गार …

Read More »

मार्कंडेय नदी ओव्हरफ्लो!

  बेळगाव : पश्चिम घाटात आणि बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे बेळगाव तालुक्यातील मार्कंडेय नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची पिके मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहेत. मार्कंडेय नदीत पाण्याची आवक वाढल्याने बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी, अलतगा, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक या गावातील शेतकर्‍यांच्या शेतजमिनीत पाणी शिरले असून मोठ्या प्रमाणात पिकांचे …

Read More »

आगामी निवडणुकीत विकासकामेच ठरणार काँग्रेससाठी वरदान : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

कुडची : मागील काळात काँग्रेस सरकारने सुशासन देण्याबरोबरच अनेक विकासकामे केली असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही विकासकामे वरदान ठरणार आहेत, असे मत बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. कुडची विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी व पक्ष संघटनेच्या हितासाठी 6 दिवस आयोजित भव्य सायकल जथ्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचे …

Read More »