Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

रक्तदानासाठी स्वयंप्रेरणेने पुढे या : विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांचे आवाहन

  बेळगाव : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे अनेकांना जीवदान मिळू शकते. त्यामुळे स्वयंप्रेरणेने रक्तदान करण्यास पुढे आले पाहिजे. आपणही विद्यार्थी जीवनात अनेक वेळा रक्तदान केले असून, अनेक रक्तदान शिबिरे भरविल्याचे विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांनी बिम्स सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना केले. अलायन्स क्लब, रेड क्रॉस …

Read More »

चांगल्या समाजासाठी धर्म, मानवता तत्त्वामध्ये एकोपा आवश्यक : राज्यपाल गहलोत

  बेळगाव : चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी धर्म आणि मानवतावादी तत्वांदरम्यान सुसंवाद एकोपा आवश्यक असल्याचे मत राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी व्यक्त केले. शहरातील सिद्धसेन रिसर्च फाउंडेशन येथे आज मंगळवारी आयोजित 1008 व्या भगवान श्री महावीर यांचा 2550 व्या निर्वाण महोत्सव, पूज्य आचार्यनाथ श्री 108 बाहुबली मुनी महाराज यांची 92 वी जयंती …

Read More »

गणेश दूध संकलन केंद्रामध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचा शुभारंभ

  उचगाव : बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील बेळगुंदी फाट्यानजिक असलेल्या गणेश दूध संकलन केंद्र व गणेश मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रोजेक्टर बसविणारे हे बेळगाव तालुक्यातील एकमेव केंद्र असल्याचा दावा या केंद्रप्रमुखांनी केला आहे. या सांडपाणी शुद्धीकरण यंत्रसामग्रीचा शुभारंभ नुकताच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या दूध संकलन केंद्रामध्ये दुधापासून …

Read More »

कर्नाटक राज्यात 6237 गावात पाणीटंचाईची शक्यता; मंत्री कृष्णा बैरेगौडा यांची माहिती

  बेळगाव : राज्यातील संभाव्य पाणीटंचाई गावांची यादी तयार करण्यात आली आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात तहानलेल्या गावांची संख्या 6237 इतकी होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी 24 तासात टँकरने पाणीपुरवठा आणि खाजगी कुपनलिका ताब्यात घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना बजावले आहेत. तसेच आंतरराज्य चारा वाहतुकीचे निर्बंधचे आदेश 23 नोव्हेंबरला देण्यात आले आहेत. …

Read More »

महिलेला विवस्त्र करून मारहाण; न्यू वंटमुरी येथील घटना

  बेळगाव : आपल्या मुलीला पळवून नेले म्हणून त्या मुलाच्या आईला विवस्त्र तसेच मारहाण करुन खांबाला बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना न्यू वंटमुरी (ता. बेळगाव) येथे रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली असून या निंद्य कृत्याची दखल गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनीही घेतली आहे. या घृणास्पद घटनेप्रकरणी सात …

Read More »

राष्ट्रवीर शामराव देसाईंनी बहुजन समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले : ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉ. भरत पाटणकर

  बेळगाव : राष्ट्रवीर शामराव देसाईंनी बहुजन समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले. वेळोवेळी आपल्या लेखनातून समाजात क्रांतीकारी परिवर्तन घडवून आणले. सत्यशोधक विचार समाजात बिंबविण्याचा वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. दुःख मुक्त होण्याचे सुप्न कार्ल मार्क्स, गौतम बुद्ध, संत तुकाराम, संत कबीर यासह अनेक थोर महामानवानी सांगून गेले आहेत तेच विचार …

Read More »

भाजप आमदार अधिवेशनाचा वेळ वाया घालत आहेत; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची टीका

  मंत्री जमीर अहमद यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक बेळगाव – काँग्रेस पक्ष संविधानानुसार चालणारा पक्ष आहे, याउलट भारतीय जनता पक्ष संविधान आणि संसदीय व्यवस्थेच्या विरोधी आहे. भारतीय जनता पक्ष उत्तर कर्नाटकातील जनतेच्या विरोधात काम करत आहे. हिवाळी अधिवेशनात वेळ वाया घालवण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी चालविले आहे. हा या …

Read More »

प्रथमोचार वैद्यकीय सहाय्यक संघटनेच्या मागण्यांसाठी आंदोलन

  बेळगाव : कर्नाटक राज्य ग्रामीण प्रथमोपचार डॉक्टर संघटनेच्या मागणीसाठी आज बेळगाव येथील सुवर्णसौध परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक राज्य ग्रामीण प्रथमोपचार डॉक्टर्स असोसिएशनचे सचिव आर. आर. पाटील म्हणाले की, आमच्या संस्थेचे सदस्य ग्रामीण भागात आरोग्य, वाहतूक सेवा यासारख्या योग्य पायाभूत सुविधांपासून वंचित असलेल्या ग्रामीण भागात आणि झोपडपट्टीत वैद्यकीय …

Read More »

बळ्ळारी नाल्याची समस्या यावर्षी तरी मार्गी लागेल का?

  बेळगाव : गेल्या 2013 पासून आजपर्यंत बळ्ळारी नाल्याचा विकासाची फक्त चर्चा होत आहे. या नाल्यातील गाळ, जलपर्णी काढून बाजूने बफर झोनप्रमाणे जागा सोडत परिसरातील शेतीचे पाणी त्यात जाण्यासाठी योजना आखून शेतीचे नुकसान न होता परिसरातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची संकल्पना असली तरी ती आजतागायत प्रत्यक्षात उतरलेली नाही. शेतकऱ्यांनी वेळोवेळी मोर्चा, …

Read More »

संवाद लेखन स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न

  बेळगाव : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई यांच्या बेळगाव शाखेच्या वतीने शालेय स्तरावरील संवाद लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत बेळगाव आणि परिसरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. ही स्पर्धा गट अ (५ वी ते ७ वी) आणि गट ब (८ वी ते १० वी) …

Read More »