Sunday , July 26 2026
Breaking News

समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांचा उद्यापासून प्रचाराचा शुभारंभ!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव तुकाराम पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवार दिनांक 12 रोजी सकाळी ठीक 9.00 वाजता उचगाव येथील मळेकरणी देवीला साकडे घालून पूजन करून केला जाणार आहे. तरी या प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला शहर व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची, आजी माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील यांनी केले आहे.

 

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *