Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

वैश्यवाणी समाजातर्फे कोजागिरी पौर्णिमा उत्सव

  बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्य वाणी समाज, युवा संघटना, महिला मंडळ यांच्यावतीने शनिवार दिनांक 11/10/2025 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता रामनाथ मंगल कार्यालय, भाग्यनगर येथे कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त संस्थेच्या वतीने विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम सायंकाळी ठीक 5 वाजता स्वरामृत वर्षा …

Read More »

प्रगतिशील लेखक संघातर्फे उद्या निषेध सभा

  बेळगाव : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेला हल्ल्याचा प्रयत्न ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. या निंद्य प्रकाराचा निषेध करण्यासाठी प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शहीद भगतसिंग सभागृह, गिरीश कुबेर कॉम्प्लेक्स, रामदेव गल्ली येथे ही सभा होणार आहे. …

Read More »

पत्नीकडून पतीला कारमध्ये जाळण्याचा प्रयत्न

  चिक्कोडी : कौटुंबिक वादातून पत्नीनेच पतीला कारमध्ये बसवून पेटवून मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. चिक्कोडी तालुक्यातील पोगात्यानट्टी गावात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील पोगात्यानट्टी गावात कौटुंबिक वादाने गंभीर वळण घेत एक धक्कादायक घटना घडली आहे. गावातील प्रगतीशील शेतकरी शिवगौडा …

Read More »

संविधानाचा अपमान करणाऱ्या माथेफिरूवर कारवाई करा

  ऑल इंडिया पँथर सेनेसह दलित संघटनांची मागणी; उपतहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : सर्वोच्च न्यायालयामध्ये माथेफिरू आणि मनोवादी विचारधारेचा वकील किशोर राकेश तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या अंगावर बूट फेकण्याचा निधनीय प्रकार करून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. या या घटनेमुळे भारतीय संविधानाचा अवमान झाला आहे. त्यामुळे …

Read More »

“काळा दिन” पाळण्यास परवानगी नाही : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

  बेळगाव : यंदा कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी “काळा दिन” पाळण्यास परवानगी नसल्याचे प्रशासनाच्या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले. राज्योत्सवाच्या नियोजना संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आयोजित बैठकीत स्पष्ट केले की, महाराष्ट्र एकीकरण समितीला राज्योत्सवाच्या दिवशी काळा दिन पाळण्यास कोणत्याही प्रकारची …

Read More »

येळ्ळूर ग्रा.पं.मधील भ्रष्टाचारावर तातडीने कारवाई करा

  बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायतीत झालेल्या कथित गैरव्यवहारांवर एडीजीपी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करून, एका आठवड्याच्या आत कारवाई न केल्यास लोकायुक्तांकडे तक्रार आणि उच्च न्यायालयात सार्वजनिक हित याचिका दाखल करू, असा इशारा वकील आणि पर्यावरणवादी सुरेंद्र उगारे यांनी दिला आहे. आज बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते …

Read More »

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीसाठी सहकाररत्न उत्तम पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी जिल्ह्यात सर्वच उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी बोरगाव येथी सहकाररत्न उत्तम पाटील यांनी गुरुवारी (ता.९) मान्यवरांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उत्तम पाटील म्हणाले, बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील …

Read More »

बेळगावातील भाषिक अल्पसंख्याकांचा अहवाल पाठवा; केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

  बेळगाव : बेळगाव जिल्हा प्रशासनाने अल्पसंख्याक बाबत कोणती पाऊले उचलली आहेत यावर अहवाल पाठवा असे पत्र 30 सप्टेंबर रोजी केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाचे उपायुक्त एस. शिवकुमार यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना पत्र पाठवले आहे. भारत सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या भाषिक अल्पसंख्याक सहाय्य आयुक्त कार्यालयाकडून बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना १८ ते १९ …

Read More »

मराठी भाषा प्रेमी मंडळातर्फे अभिजात काव्य सुमने कार्यक्रम संपन्न

  बेळगाव : राज्य मराठी भाषा विकास संस्था मुंबई व बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली यांच्या वतीने अभिजात मराठी सप्ताह या माध्यमातून आज बुधवार दिनांक ८ रोजी सायंकाळी वरेरकर नाट्य संघ सभागृहात ‘अभिजात काव्य सुमने’ हा बेळगावातील कवी-कवयित्री यांच्या स्वरचित व बेळगावातील सुप्रसिद्ध कवींच्या कवितांचे वाचन व भावार्थ या कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

52 मतदारांना सोबत घेऊन माजी खासदार रमेश कत्ती यांचे शक्तीप्रदर्शन!

  बेळगाव : हुक्केरी मतदार संघातून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार माजी खासदार रमेश कत्ती यांनी आज पुन्हा एकदा आपल्या मतदार क्षेत्रातील 52 मतदारांना सोबत घेऊन शक्तीप्रदर्शन करत नामनिर्देश पत्र दाखल केले आहे. काल मंगळवारी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी हुकेरी मतदारसंघातील आपल्या 42 समर्थकांच्या पाठिंब्याने राजेंद्र पाटील …

Read More »