Tuesday , July 28 2026
Breaking News

बेळगाव

उतारा समस्येवरून शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

  बेळगाव : जमिनीच्या उताऱ्यासंदर्भातील अडचणी, वाढते शुल्क आणि कथित अनियमिततेच्या निषेधार्थ राज्य किसान संघाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. उतारा मिळविताना शेतकऱ्यांना आर्थिक व प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आंदोलक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी जमिनींच्या एकत्रित नोंदी असल्यामुळे स्वतंत्र उतारा …

Read More »

स्वरूपायनमधून प्रा. स्वरूपा इनामदार यांनी उलगडले स्त्रीचे विविध पैलू

  ‘कवी समजून घेताना’ उपक्रमाचे सातवे पुष्प उत्साहात संपन्न बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने आयोजित ‘कवी समजून घेताना’ या उपक्रमाच्या सातव्या पुष्पात ज्येष्ठ कवयित्री, शब्दगंध कवी मंडळाच्या सदस्या तथा सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. स्वरूपा इनामदार यांनी आपल्या कवितांमधून स्त्रीजीवनाचे विविध पैलू प्रभावीपणे उलगडून दाखविले. सरस्वती वाचनालय, …

Read More »

येळ्ळूर म.ए. समितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी वामन पाटील, कार्याध्यक्षपदी दुद्दाप्पा बागेवाडी, सेक्रेटरी प्रकाश अष्टेकर

  सीमा प्रश्नाच्या लढ्यासाठी गाव पुन्हा संघटित; आगामी मोर्चे व आंदोलनात मोठ्या सहभागाचा निर्धार येळ्ळूर : सीमाप्रश्नाच्या लढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली असून अध्यक्षपदी वामन पाटील, कार्याध्यक्षपदी दुद्दाप्पा बागेवाडी आणि सेक्रेटरीपदी प्रकाश अष्टेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. रविवारी (दि. १४) यरमाळेजवळील …

Read More »

युवा समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; मराठी शिक्षण, नेतृत्व व स्पर्धा परीक्षांचे महत्त्व अधोरेखित

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५-२६ शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीमध्ये बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर गटशिक्षण विभागात पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवून यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा सत्कार सोहळा संपन्न. हा सोहळा रविवार १४ जून रोजी श्री …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कन्नड सक्तीच्या विरोधात येत्या २२ जून रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे तरी या मोर्चात सहभागी होण्यासाठी तसेच सीमाप्रश्न सोडविण्यासाठी योग्य ती पावले उचलली जावी आणि तज्ञ समिती बैठक बोलाविण्यात यावी यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्रचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धरणं आंदोलन करण्यात येणार …

Read More »

कन्नड फलकसक्तीविरोधात २२ जूनच्या भव्य मोर्चासाठी आजपासून जनजागृती मोहीम

  बेळगाव : बेळगाव शहर आणि सीमाभागात सुरू असलेल्या कन्नड फलकसक्तीविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आता आक्रमक भूमिका घेतली असून, २२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या भव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आजपासून व्यापक जनजागृती मोहिमेला प्रारंभ करण्यात येत आहे. मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळावा यासाठी समितीचे कार्यकर्ते शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांशी थेट …

Read More »

भारत विकास परिषदेच्या बेळगाव अध्यक्षपदी विनायक मोरे यांची तिसऱ्यांदा फेरनिवड

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्या बेळगाव शाखा अध्यक्षपदी विनायक मोरे यांची सर्वानुमते सलग तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली. दोन वर्षे उत्कृष्ट सेवाकार्य केल्यामुळे त्यांना पुन्हा अध्यक्षीय दायित्व देण्यात आले. सेक्रेटरी म्हणून के. वासुदेव प्रभू व खजिनदार म्हणून डी. वाय. पाटील यांची निवड करण्यात आली. कर्नाटक उत्तर प्रांत संगठन सचिव म्हणून …

Read More »

प्लास्टिकमुक्तीचा संदेश देत जायंट्स मेनतर्फे खासबाग आठवडी बाजारात ८५० कापडी पिशव्यांचे वाटप

  बेळगाव : वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यास निर्माण होणाऱ्या गंभीर धोक्यांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने खासबाग येथील आठवडी बाजारात सुमारे ८५० कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आठवडी बाजारात भाजीपाला, फळे व इतर वस्तू खरेदीसाठी आलेल्या …

Read More »

शाळा क्र. ३३ च्या परिसरातील धोकादायक पाण्याची टाकी हटवणार; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेचे तात्पुरते स्थलांतर

  बेळगाव : विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शाळेच्या भौतिक सुविधा आणि शैक्षणिक वातावरण जपण्यासाठी एसडीएमसी समिती, जागरूक पालकवर्ग तसेच शाळाप्रेमी नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. जुने बेळगाव येथील सरकारी मराठी पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ३३ च्या परिसरातील धोकादायक आणि जीर्ण झालेली पाण्याची टाकी हटविण्याच्या मागणीला अखेर यश मिळाले असून, येत्या आठ दिवसांत …

Read More »

बेळगावात अँटी स्टॅबिंग स्क्वॉडची धडक कारवाई; दोन जण अटकेत, कारसह घातक शस्त्रे जप्त

  बेळगाव : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मार्केट पोलीस ठाण्याच्या अँटी स्टॅबिंग स्क्वॉडने राबविलेल्या विशेष मोहिमेत दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवायांमध्ये दोन कार आणि दोन घातक शस्त्रे जप्त करण्यात आली असून एकूण सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला आहे. …

Read More »