Thursday , May 28 2026
Breaking News

बेळगाव

येळ्ळूर म. ए. समितीच्यावतीने दीपक दळवी यांची उद्या शोकसभा

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष सीमाभागाचे ज्येष्ठ नेते माननीय कै. दीपक अर्जुनराव दळवी यांचे निधन झाले. त्यानिमित्ताने शनिवार दि. 21 रोजी ठीक 7-30 वा. येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने श्री चांगळेश्वरी मंदिर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शोकसभेला आजी – माजी जि. प. सदस्य, ता. …

Read More »

गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री समादेवी देवस्थानात वार्षिक गाऱ्हाणे; मान्यवरांचा सत्कार

  बेळगाव : श्री समादेवी देवस्थान, शहापूर तर्फे गुढीपाडव्याच्या निमित्ताने वैश्यवाणी समाजाचे आराध्यदैवत श्री समादेवीला वार्षिक गाऱ्हाणे घालण्यात आले. समाजाच्या सुख-शांतीसाठी पार पडलेल्या या धार्मिक कार्यक्रमानंतर कोसंबीर व पन्ह्याच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले. याचबरोबर वार्षिक शिमगोत्सव व नववर्ष स्वागत सोहळ्याच्या निमित्ताने समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभ उत्साहात पार …

Read More »

बेळगावमध्ये सायबर गुन्हेगारांचे मोठे जाळे उघड

  बेळगाव : बेळगाव शहरात सायबर गुन्हेगारांनी आपले जाळे पसरवले असून तब्बल २ हजार ९९२ ‘म्युअल अकाउंट्स’द्वारे व्यवहार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शुक्रवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना या रॅकेटचा पर्दाफाश केला.शहरात सध्या २ हजार ९९२ म्युअल अकाउंट्स सक्रिय असल्याचे तपासात निष्पन्न झाले …

Read More »

पिरनवाडी येथील एकाला गांजा विक्री प्रकरणी अटक

  बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैतून माळ येथे गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून १ किलोपेक्षा जास्त गांजा जप्त केला आहे.महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमा भागातून गांजा आणून बेळगावमध्ये विक्री केली जात होती. सीसीबीचे पोलीस निरीक्षक …

Read More »

माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांनी घेतली दीपक दळवी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिवंगत दीपक दळवी यांच्या कुटुंबीयांची आज शुक्रवारी महाराष्ट्राचे माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपले आयुष्य वेचणारे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे झुंजार व्यक्तिमत्त्व असलेले अध्यक्ष दीपक दळवी यांचे गेल्या मंगळवारी वयाच्या 84 व्या …

Read More »

न्यायाधीश प्रियांका राजगोळकर यांचा सत्कार

  बेळगाव : शाहूनगर, बेळगाव येथील रहिवासी प्रियांका राजगोळकर यांची दिवाणी न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल शाहूनगरवासियांतर्फे अभिनंदन करून नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. शाहूनगर येथील रहिवासी प्रियांका राजगोळकर -बेकवाडकर यांनी दिवाणी न्यायाधीश परिक्षा उत्तम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊन न्यायाधीशपदाला गवसणी घातली आहे. या पद्धतीने न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्दल प्रियांका यांचे त्यांच्या …

Read More »

श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थानमध्ये गुढी पाडवा उत्साहात साजरा

  बेळगाव : हिंदू नववर्ष व गुढी पाडव्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सर्व पत्रकार बंधूंना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. आज पहाटेपासून मंदिर परिसरात सनई-चौघड्यांच्या मंगल ध्वनीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या पावन दिनानिमित्त रुद्राभिषेक व पंचांग पूजन विधी पार पडले. त्यानंतर मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे …

Read More »

बेळगावात गुन्हेगारीवर पोलिसांचा बडगा; तीन सराईत गुन्हेगार 6 महिन्यांसाठी तडीपार

बेळगाव : शहरातील वाढत्या बेकायदेशीर धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेत तीन सराईत गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याची कारवाई केली आहे. मटका, पत्त्यांचा जुगार आणि गांजा विक्रीसारख्या अवैध कृत्यांमध्ये सातत्याने सहभागी असलेल्या तिघांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सर्फराज शब्बीरअहमद शेख (रा. शहापूर), विनायक प्रकाश …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी यांच्या निमित्त उद्या शोकसभा

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांच्या दुःखद निधनाबद्दल शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी सायंकाळी ठीक 4-30 वाजता तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल हायस्कूल जवळ) टिळकवाडी बेळगाव येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.।या शोकसभेस नागरिक व समिती कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने महिला दिनानिमित्त “होम मिनिस्टर”

  बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ रविवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित खास आकर्षण असलेल्या “होम मिनिस्टर” स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन …

Read More »