बेळगाव: किल्ला तलावात बुडणाऱ्या महिलेला वाचवणाऱ्या बेळगावच्या ट्रॅफिक पोलीसाच्या नावाची मुख्यमंत्री पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रॅफिक पोलिस काशिनाथ इरगर यांनी शनिवारी किल्ला तलावात बुडणाऱ्या महिलेला वाचवले. महिलेला पाण्यात बुडताना पाहून काशिनाथने तातडीने पाण्यात उडी मारून तिला वाचवले. तलावात बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवणाऱ्या ट्रॅफिक पोलीस काशिनाथ इरगर …
Read More »अलारवाड क्रॉसजवळ विद्युत खांब शेतात पडून; हेस्कॉमचे दुर्लक्ष
बेळगाव : सततच्या पावसामुळे अलारवाड क्रॉस येथील रस्त्याशेजारी शेतवडीत चार-पाच विजेचे खांब गेल्या चार दिवसापासून उन्हाळून पडलेले आहेत. स्थानिक नागरिकांनी हेस्कॉमकडे रीतसर तक्रार करून देखील ते विद्युत खांब हटविण्यात आलेले नाहीत त्यामुळे जीवितहानी झाल्यानंतरच हेस्कॉमला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल या भागातील शेतकरी विचारत आहेत. मागील चार …
Read More »अतिवृष्टीमुळे बैलहोंगल तालुक्यात 3 घरांची पडझड; 13 जण जखमी
बेळगाव : बेळगावभर मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बैलहोंगल तालुक्यातील बुदरकट्टी गावात तीन घरांची पडझड झाली असून 13 जण जखमी झाले आहेत. एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. मुसळधार पावसामुळे घराची पडझड झाली असून जखमींना हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इरय्या पत्रायणवर, शंकरप्पा आणि बसवण्णा यांची …
Read More »दि. बेळगांव बेकर्स सोसायटीच्या चेअरमनपदी राजाराम सूर्यवंशी तर व्हा. चेअरमनपदी सुरेखा मेलगे
बेळगांव : येथील सहकार क्षेत्रातील सुवर्ण महोत्सवी संस्था दि. बेळगांव बेकर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. राजाराम जयवंत सूर्यवंशी व व्हाईस चेअरमनपदी सौ. सुरेखा परशराम मेलगे यांची एकमताने निवड करण्यात आली. ताशिलदार गल्ली येथील संस्थेच्या सभागृहात झालेल्या नूतन संचालक मंडळाच्या बैठकीत निवडणूक अधिकारी श्री. एन. एल. हुलकुंद यांनी निवडणूक …
Read More »येळ्ळूर येथे सापडले स्त्री जातीचे नवजात मृत अर्भक!
बेळगाव : येळ्ळूर येथे स्त्री जातीचे नवजात अर्भक मृतावस्थेत सापडल्याने येळ्ळूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची माहिती समजतात रात्री उशिरा पोलिसांनी ते अर्भक ताब्यात घेऊन पुढील तपास चालू केला आहे. या घटनेमुळे येळ्ळूर परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे चांगळेश्वरी गल्ली येथील संभाजी पाटील यांच्या घराच्या मागील बाजूस …
Read More »टिळकवाडी पोलिसांकडून चोरटा गजाआड; 4 लाखाचे दागिने जप्त
बेळगाव : टिळकवाडी येथील दोन घरफोडी प्रकरणांचा छडा लावताना टिळकवाडी पोलिसांनी एका चोरट्याला गजाआड केले असून त्याच्याकडील 4 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी चोरट्याचे नांव अनिलकुमार मिसरीलाल राजबार (वय 36, रा. बोदारी, उत्तर प्रदेश) असे आहे. गेल्या कांही दिवसांपूर्वी टिळकवाडी पोलीस ठाण्यामध्ये …
Read More »माळ मारुती पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचाऱ्यांना दिली डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक लस
बेळगाव : रात्रंदिवस जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांचे आरोग्य सुरक्षित रहावे त्यांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचे आजार उद्भवू नये याकरिता एंजल फाउंडेशनच्या वतीने डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक देण्यात आली. येथील माळ मारुती पोलीस संघातील सर्व पोलीस कर्मचारी रात्रंदिवस जनतेप्रति आपली सेवा बजावीत असतात तसेच पावसाळ्यात अहोरात्र काम करत असतात. त्यांना कुठेही …
Read More »4 लाख रू. किमतीचा बेकायदेशीर बनावट दारू साठा जप्त!
बेळगाव : शहरातील सीसीबी पोलिसांनी काल गुरुवारी सदाशिवनगर येथील वीरूपाक्षी रेसिडेन्सी या अपार्टमेंटमध्ये धाड टाकून तब्बल 4 लाख रुपये किमतीचा बेकायदेशीर बनावट दारू साठा व इतर साहित्य जप्त केले असून याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. हसन साहेब बेपारी (वय 22, रा. उज्वलनगर, बेळगाव) आणि राजेश केशव नायक …
Read More »भारतीय कृषक समाजातर्फे शेतकरी हुतात्मा दिन गांभीर्याने
बेळगाव : भारतीय कृषक समाज, संयुक्त होराट कर्नाटक आणि यद्येळू कर्नाटका हागू प्रगतीपर संघटनेगळू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नरगुंद -नवलगुंद आंदोलनात बलिदान दिलेल्या शेतकऱ्यांचा 43 वा हुतात्मा दिन कार्यक्रम आज सकाळी गांभीर्याने पार पडला. शहरातील कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बीकेएस तालुका अध्यक्ष संजीव डोंगरगाव हे होते. …
Read More »पालकांची लूट करणाऱ्या शाळांवर कर्नाटक शासनाने उगारला कारवाईचा बडगा!
निपाणी : निपाणीतील अनुदानीत व विनाअनुदानीत शाळेत विद्यार्थ्यांकडून कर्नाटक राज्य सरकारने ठरवून दिलेल्या फी पेक्षा प्रमाणाबाहेर फी ची आकारणी करून कमी रकमेची पावती दिली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर “4 जे आर ह्युमन राईट्स केअर आँरगेनायझेशन” या संघटनेच्यावतीने शिक्षणमंत्री कर्नाटक राज्य, शिक्षणाधिकारी बेंगलोर, शिक्षणाधिकारी बेळगाव व क्षेत्र शिक्षणाधिकारी, निपाणी गटशिक्षणाधिकारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta