Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी सुवर्णसौधला घेराव घालणार आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि नुकसानभरपाईतील विलंबाबद्दल भाजप नेते आर. अशोक आणि बी. वाय. विजयेंद्र यांनी सरकारला धारेवर धरले. ९ डिसेंबर रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी मालिनी …

Read More »

महाराष्ट्राच्या बसेस रोखून करवे कार्यकर्त्यांनी शंड शमवून घेतला….

  बेळगाव : बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच महाराष्ट्र एकीकरण समितीने जोरदार निदर्शने केली आहेत. एकीकडे कोल्हापुरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटच्या बसेस रोखून निषेध केला, तर दुसरीकडे महामेळावा घेण्यासाठी बेळगावात येण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे समितीकार्यकर्त्यांच्या निदर्शनाचा विरोध करत करवे कार्यकर्त्यांनी बेळगावात …

Read More »

भोवी वड्डर समाजाचा 17 डिसेंबर रोजी सुवर्णसौध समोर धरणे सत्याग्रह

  बेळगाव : मागास जातींसाठीच्या आरक्षणाच्या बाबतीत न्यायमूर्ती नागमोहन दास यांच्या अहवालातील उणीवा आणि सरकारचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याच्या निषेधार्थ, तसेच भोवी वड्डर समाजाला 3 टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येत्या बुधवार दि. 17 डिसेंबर 2025 रोजी बेळगाव सुवर्ण विधानसौध समोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती समाजाचे पंचपीठ अध्यक्ष श्री …

Read More »

कर्नाटक दडपशाहीला जुगारून प्रशासकीय जागेत महामेळावा यशस्वी

  बेळगाव : पहाटेपासून अटकसत्र सुरू करून महामेळावा उधळून लावण्याचे कर्नाटकी प्रयत्न हाणून पाडत चक्क ए.पी.एम.सी. मार्केटमध्येच महामेळावा पार पडला. या महामेळाव्याचे अध्यक्षस्थान निडगलचे जेष्ठ सीमा सत्याग्रही शंकरराव पाटील यांनी भूषविले. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी ए.पी.एम.सी. परिसर दणाणून गेला होता. काल जिल्हा प्रशासनाने मध्यवर्ती म. ए. समितीला मेळावा घेण्यास परवानगी …

Read More »

टिळकवाडी येथील न्यू शिवाजी कॉलनीतील परिसर बनला कचरा डेपो!

  बेळगाव : मंत्री महोदय येती गावा, तोची दिवाळी दसरा अशी काहीशी स्थिती बेळगाव शहरात सध्या पहावयास मिळत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात मंत्री महोदय व आमदार आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरातील मुख्य रस्त्यांची डागडुजी तसेच सुशोभीकरण मागील महिनाभरापासून सुरू आहे. परंतु बेळगाव शहरातील न्यू शिवाजी कॉलनी टिळकवाडी परिसर मात्र कचरा …

Read More »

महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर व्हॅक्सिन डेपो परिसरात बॅरिकेट्स!

  बेळगाव : बेळगाव वर आपला हक्क दाखविण्यासाठी 2006 पासून बेळगावात कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन भरविण्यात येते. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना देखील कर्नाटक सरकारच्या वतीने बेळगावात सुवर्णसौध उभारून दरवर्षी हिवाळी अधिवेशन भरविले जाते. अशाप्रकारे अधिवेशन भरविणे हे लोकशाही विरोधी आणि घटनाबाह्य कृत्य आहे. कर्नाटक सरकारच्या या कृतीचा निषेध …

Read More »

हिवाळी अधिवेशनासाठी बेळगावचे सुवर्णसौध सज्ज

  बेळगाव : उद्या सोमवार पासून बेळगावात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. दहा दिवस चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या अधिवेशनात सुवर्णसौध आवारात सभाध्यक्षांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकाविण्यात येणार आहे, नेहमीप्रमाणे यावर्षीही हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णसौध आकर्षक रोषणाईने झळाळून निघाले आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन अधिवेशन काळातील प्रत्येक …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी माजी नगरसेवक नेताजी जाधव, उपाध्यक्षपदी उद्योजक रघुनाथ बांडगी, मानद कार्यवाहपदी लता पाटील व सहकार्यवाहपदी प्रसन्न हेरेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीचा ठराव कार्यकारी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य …

Read More »

अलतगा फाटा ते अगसगे गावापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित

  बेळगाव : अलतगा फाटा ते अगसगे गावापर्यंतचा रस्ता डांबराची वाहतूक करणाऱ्या वाहनातील डांबर रस्त्यावर पडून खडबडीत झाला असून या रस्त्यावरून वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी समिती कार्यकर्ते मनोहर हुंदरे यांनी केली आहे. अलतगा फाटा ते अगसगे या रस्त्यावर डांबर वाहतूक …

Read More »

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 4000 पोलिसांची कुमक तैनात

  बेळगाव : बेळगावात उद्यापासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी राज्यभरातून सुमारे 4000 पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. 8 डिसेंबर पासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुवर्णसौधमध्ये होणारे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी धारवाड, बागलकोट, उडपी, पीटीएस प्रशिक्षण केंद्र अशा विविध …

Read More »