Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

खानापूर तालुक्यातील दहा विद्यार्थी नव्या राष्ट्रीय शिक्षण नीतीचे शिकार

  खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध पदवी महाविद्यालयातील जवळ जवळ दहा विद्यार्थी नवीन राष्ट्रीय शिक्षण नीतीचे (NEP) चे बळी ठरले आहेत. बारावी नंतर महाविद्यालयात प्रवेश मिळविताना कसरत न करता प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी याकरिता राज्य सरकारने UUCMS नावाचे संगणक वेबसाइट तयार केले. त्यामुळे विद्यार्थी त्या वेबसाइटच्या माध्यमातून प्रवेश घेतात. पुढे …

Read More »

शहापूर बसवण्णा देवाची यात्रा भक्तिभावाने

  बेळगाव : बेळगावच्या शहापूरमधील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बसवण्णा देवाची यात्रा भक्तिभावाने पार पडली. शहापूर खडेबाजारमधील प्राचीन बसवण्णा महादेव देवाची वार्षिक यात्रा शुक्रवारी सायंकाळी भक्तिभावाने पार पडली. यानिमित्तदिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हजारो भाविकांनी दिवसभर मंदिरात श्रीफळ, फुले, कापूर, उदबत्त्या आदी पूजा साहित्य घेऊन दर्शनासाठी गर्दी …

Read More »

राज्यात काँग्रेसचा विजय निश्चित : ऍड. चंद्रहास अणवेकर यांचा विश्वास

बेळगाव   40 टक्के कमिशन सरकार अशी प्रतिमा बनलेल्या भाजप सरकारला जनता विटली आहे. जनतेच्या काँग्रेस प्रति आशा वाढल्या आहेत.त्यामुळे या वेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष कर्नाटक राज्यात सत्तेवर येईल. त्याचबरोबर बेळगाव दक्षिण बेळगाव दक्षिण मतदार संघात काँग्रेस उमेदवाराचा विजय निश्चित आहे, असा विश्वास कर्नाटक प्रदेश काँग्रेस ओबीसी विंगचे राज्य उपाध्यक्ष …

Read More »

रामनवमी निमित्त श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे भव्य शोभायात्रा; भगवेमय वातावरण

  बेळगाव : हत्ती-घोडे, बैलगाड्यांसह ढोलताशांच्या गजरात रामनवमीनिमित्त बेळगावात आज श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या मिरवणुकीत हजारो रामभक्तानी जल्लोषात सहभाग घेतला. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाला बेळगावात आज अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे शहरात श्रीराम, रामभक्त हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वगुरू बसवण्णा यांच्या …

Read More »

बेळगावात रामनवमी भक्तिभावाने साजरी

  बेळगाव : बेळगाव शहर व परिसरात आज रामनवमी भक्तिभावाने साजरी करण्यात येतीय. यानिमित्त भक्तांनी श्रीराम मंदिरात मनोभावे पूजा करून मर्यादा पुरुषोत्तमाला नमन केले. बेळगाव शहरात आज रामनवमीनिमित्त भक्तिभावाचा पूर ओसंडून वाहात असल्याचे चित्र दिसून आले. ठिकठिकाणच्या श्रीराम मंदिरात आज पहाटेपासूनच अबालवृद्ध भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचे दिसून आले. बेळगाव शहरातील …

Read More »

‘नवहिंद सोसायटी’च्या चेअरमनपदी प्रकाश अष्टेकर तर व्हा. चेअरमनपदी अनिल हुंदरे

  येळ्ळूर : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या नवहिंद को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. प्रकाश पांडुरंग अष्टेकर यांची तर व्हा. चेअरमनपदी श्री. अनिल हणमंत हुंदरे यांची निवड करण्यात आली. सदर निवड 1 एप्रिल 2023 ते 30 नोव्हेंबर 2025 या अडीच वर्षांसाठी असणार आहे. 1 एप्रिल 2023 …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकारी व सभासदांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे.

Read More »

सीमाभागात आपली मातृभाषा टिकली पाहिजे : समिती युवा नेते आर. एम. चौगुले

  बेळगाव : क्रिकेट सारख्या खेळामुळे तरुणांनी आपला आवडता छंद जोपासावा तसेच आपले शरीरही सुदृढ ठेवावे. अशा क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपली एकी मजबूत ठेवावी व आपला सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे. तसेच युवकांनी सीमाभागावर जो अन्याय होत आहे ते अन्यायाच्या विरोधात उठून कार्य केले पाहिजे व आपली मातृभाषा टिकली पाहिजे, असे …

Read More »

आचारसंहितेचे उल्लंघन केलास कठोर कारवाई : जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

  बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता बुधवार पासून लागू होत असल्याने सार्वजनिक ठिकाणावरील सर्व पोस्टर्स, बॅनर, भित्तिचित्रे काढून टाकण्यात यावीत. निवडणूक कर्तव्यासाठी नेमलेल्या सर्व पथकांनी तातडीने कामाला लागावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणूक अधिकारी व …

Read More »

“शांताई”तर्फे उद्या डाॅ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान

  बेळगाव : शांताई वृद्धाश्रम आणि आयएमईआरच्या संयुक्त विद्यमाने ‘शांताई’च्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या गुरुवार दि. 30 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुप्रसिद्ध डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मधुमेहावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. डॉ. जगन्नाथ दीक्षित हे मधुमेह मुक्त भारत व्हावा या उद्देशाने मधुमेह कशा पद्धतीने बरा होईल? आणि …

Read More »