खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने यशवंत बिर्जे आणि प्रकाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अष्टप्रतिनीधी मंडळाने १९ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या महामेळाव्याची पत्रके खानापूर शहरात वाटण्यात आली. यावेळी आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, डी. एम. भोसले, अरुण पाटील, जयराम देसाई, अमृत पाटील, विठ्ठल गुरव, विशाल पाटील, प्रल्हाद मादार, प्रवीण …
Read More »येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा, रयत संघटनेची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत त्यातच राज्यातील २१ साखर कारखान्यावर सरकारने धाड टाकून चौकशी सुरू केली. त्यात आपल्या जिल्ह्यातील ७ ते ८ साखर कारखान्याचा समावेश आहे. या धाडीत साखर कारखाने वजन काट्यात तफावत असल्याचे दिसून आले. अशा साखर कारखान्यानी शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान केले. ती नुकसानभरपाई द्यावी. …
Read More »नंदगड जिल्हा पंचायत क्षेत्रात महामेळाव्याची जनजागृती
खानापूर : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अष्टप्रतिनीधी मंडळाचा दौरा नंदगड जिल्हा पंचायत क्षेत्रामध्ये शनिवार दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी पार पडला. सदर दौऱ्यामध्ये नंदगड येथील श्री माऊली मंदिर येथे सभा पार पडली, सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सत्याग्रही पुंडलीकराव चव्हाण हे होते. यावेळी रमेश धबाले, प्रकाश चव्हाण, यशवंत बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली …
Read More »मतभेदांना दूर ठेवत चळवळीला बळकटी द्या : ज्येष्ठ नेते संभाजी देसाई
लोंढा जिल्हा पंचायत क्षेत्रात खानापूर म. ए. समितीकडून जनजागृती खानापूर : गेली 66 वर्ष अनेक संकटे झेलून कोणत्याही आमिषाला बळी न पडता शासनाच्या दडपशाहीला न जुमानता निष्ठावंत सीमा सत्याग्रहींनी सीमाप्रश्नाची चळवळ अखंडपणे तेवत ठेवली आहे. सध्या सीमाप्रश्न न्यायप्रविष्ठ असताना चळवळ तीव्र ठेवणे गरजेचे आहे. अशावेळी मतभेदांना दूर ठेवत चळवळीला …
Read More »नियंत्रण सुटून गाडीचा चोर्ला घाटात अपघात; एक जण ठार
खानापूर : गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला झालेल्या अपघातात जमखंडी तालुक्यातील एक जण ठार तर 12 जण गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चोर्ला घाटात घडली. सदर अपघातात शिवानंद सज्जन, बनहट्टी (वय 36 जमखंडी) असे मृताचे नाव असून याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी दुपारी जमखंडी येथील कुटुंबीय टेम्पो ट्रॅव्हलरने …
Read More »दि. जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने नगराध्यक्ष नारायण मयेकर यांचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या वतीने खानापूर नगरपंचायतीचे नुतन नगराध्यक्ष नारायण मयेकर यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक चेअरमन विलासराव बेळगांवकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, अर्बन बॅंकेचे चेअरमन अमृत शेलार, …
Read More »खानापूर नगरपंचायतीकडून टॅक्स न भरलेल्या दुकान व हाॅटेल चालकाना नोटीस
चीफ ऑफिससरानी केली कारवाई खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीची सोमवारी दि. १२ रोजी मासिक बैठक पार पडली. या बैठकीत नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी खानापूर शहरातील अनेक दुकान व हाॅटेल मालकांनी टॅक्स भरला नाही. अशा दुकान व हाॅटेल मालकाना नोटीसा देऊन देऊन सुचना करा. अन्यथा सील ठोका. नाहीतर नगरपंचायतीच्या उत्पनात …
Read More »खानापूर तालुका ग्रामपंचायत संघटनेच्या सदस्यांना ओळखपत्राचे वितरण
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांनी खानापूर तालुका ग्रामपंचायत संघटनेची स्थापना केली. यावेळी ग्रामपंचायत संघटनेच्या सदस्यांना तालुक्यातील सरकारी कार्यालयात भेट देऊन चौकशी करण्यासाठी ओळखपत्र असणे गरजेचे आहे. यासाठी ओळख पत्रक तयार करून खानापूर तालुका ग्रामपंचायत संघटनेच्या सदस्यांना ओळखपत्राचे वितरण खानापूर शहरातील राम मंदिरात नुकताच करण्यात आले. यावेळी …
Read More »खानापूर शहरातील गटारीतून प्लॅस्टिक, कचरा अडकल्याने दुषित पाणी वाहण्यास अडथळा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नागरीक गटारीत प्लॅस्टिक, कचरा, सिमेंट पोती टाकून दुषित पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होऊन ड्रेनेज पाईप पॅक होत आहेत. त्यामुळे ड्रेनेज पाईप फुटून दुषित पाणी मलप्रभा नदीच्या प्रवाहात मिसळत आहे, अशी माहिती नगर पंचायतीचे प्रेमानंद नाईक यांनी दिली. बुधवारी खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटनेच्या …
Read More »महामेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार
जांबोटी विभागात समितीच्या वतीने जनजागृती खानापूर : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ 19 डिसेंबर रोजी आयोजित मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार जांबोटी भागातील समिती कार्यकर्त्यांनी केला. खानापूर तालुका म. ए. समिती नूतन कार्यकारिणी निवड करण्यासाठी व महामेळाव्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी मध्यवर्तीने नियुक्त केलेल्या आठ सदस्यीय कमिटी व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta