Wednesday , April 22 2026
Breaking News

खानापूर

अग्निपथ विरोधात खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे उपोषण

खानापूर : अग्निपथ विरोधात खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी आज रविवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत शिवस्मारक चौक खानापूर येथे लाक्षणिक उपोषण केले. केंद्र सरकारच्या अग्निपथ धोरणाच्या विरोधात आंदोलन करत निषेध व्यक्त केला. या आंदोलनाला रयत संघटनेचे श्री. बसनगौडा पाटील व त्यांच्या साथीदारांनी आपला पाठींबा दर्शविला. तसेच कन्नड …

Read More »

27 जुनचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी खानापूर समितीकडून मोदेकोपमध्ये जनजागृती

खानापूर : सीमाभागातील मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमध्ये मिळावीत यासाठी मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली 27 जुन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चाची पत्रके वाटून मोदेकोप या गावी जनजागृती करण्यात आली. यावेळी या मोर्चाला गावातील नागरिकांनी बहुसंख्येने हजर राहावे व मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी केले तसेच मराठी भाषिकांनी …

Read More »

जनता राष्ट्रीय पक्षांना वैतागली

खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्यातील काँग्रेस, भाजप, धजद या तिन्ही ही राष्ट्रीय पक्षाना वैतागली आहे. केवळ निवडणूक पैशाचा वापर करून निवडणूकी निवडून यायचे. मात्र जनतेच्या समस्याकडे दुर्लक्ष करायचे. अशाना आता घरचा रस्ता दाखवण्यासाठी आम आदमी पक्षाने पुढाकार घेतला आहे. तेव्हा खानापूर तालुक्यातील ग्राम पंचायतीपासून तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, विधानसभा निवडणुकीसाठी …

Read More »

खानापूर समितीच्या शिष्टमंडळाने घेतली मध्यवर्तीची भेट!

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती (दिगंबर पाटील) गटाचे शिष्टमंडळ आज मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांना भेटले. या बैठकीत एकी संदर्भात चर्चा करण्यात आली. सुरूवातीला मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सीमाप्रश्नाच्या दाव्यासंबंधीची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर खानापूर समितीचे ज्येष्ठ नेते आबासाहेब दळवी यांनी खानापूर म. ए. समितीच्या एकीच्या प्रक्रियेचा सविस्तर वृत्तांत मध्यवर्तीच्या …

Read More »

अग्निपथच्या विरोधात आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे उद्या उपोषण

खानापूर : अग्निपथच्या विरोधात आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर उद्या रविवार दि. १९/०६/२०२२ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शिवस्मारक चौक खानापूर येथे लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत. तरी खानापूर तालुक्यातील तरूणांनी व जनतेनी उद्याच्या उपोषणामध्ये आमदार अंजलीताईंच्या सोबत सहभागी व्हायचे आहे व युवकांवरील अन्यायाला वाचा फोडायची आहे.

Read More »

जांबोटी भागातील समस्यांबाबत आम आदमीचे तहसीलदाराना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील निलावडे येथील रेशन दुकानाला कोकणवाडा ग्रामस्थाना, जांबोटी येथील रेशन दुकानाला के. सी. कापोली, विजयनगर ग्रामस्थाना, तिर्थकुंडे रेशन दुकानाला कौलापूरवाडा ग्रामस्थाना जंगलातून ये-जा करावी लागते. तसेच एक दिवस थम देण्यासाठी व एक दिवस रेशन घेण्यासाठी यावे लागते. यासाठी आठवड्यातून एक दिवस गावात येऊन रेशन …

Read More »

बेळगाव, खानापूरातील काही गावात उद्या वीजपुरवठा खंडित

बेळगांव : दुरुस्ती व विजवाहिन्या तपासणीच्या कारणास्तव बेळगावसह खानापूर तालुक्यातील काही गावांचा वीजपुरवठा रविवारी दि. 19 रोजी खंडित होणार आहे. ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमने केले आहे. बेळगाव तालुक्यातील हालगा, बस्तवाड, शगनमट्टी, कमकारहट्टी, कोळीकोप्प, बडेकोळमठ, मास्तमर्डी बसरीकट्टी, शिंदोळी, मुतगा, श्रीराम कॉलनी, सारिगेनगर, महालक्ष्मीपुरम, साईनगर, भरतेश कॉलेज, शिंदोळी क्रॉस, निलजी …

Read More »

अग्निपथ विरोधात खानापूरात तरूणाईचा आक्रोश मोर्चा

आमदार डॉ. अंजलीताईंची तरूणाईला साथ : मोर्चात सहभागी खानापूर : आज संपूर्ण भारतात तरूण मुले मोदी सरकार विरोधात उभी ठाकली असून त्याचा प्रत्यय आज खानापूरात आला. तमाम तरूण मंडळी, होतकरू, आर्मीमध्ये भरतीसाठी मेहनत करणारे सर्व तरुण, माजी निवृत्त सैनिक तसेच आमदार अंजलीताई निंबाळकर आज सकाळी मलप्रभा ग्राऊंडवर जमले. तिथून मोदी …

Read More »

ईदलहोंड मराठी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

खानापूर : शहरातील नियती फाउंडेशनतर्फे आज खानापूर तालुक्यातील ईदलहोंड मराठी माध्यमिक शाळेतील यंदाच्या दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या दहा गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. ईदलहोंड (ता. खानापूर) येथील मराठी माध्यमिक शाळेमध्ये आज गुरुवारी आयोजित कार्यक्रमात बेळगावच्या सुप्रसिद्ध डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या नियती फाउंडेशनतर्फे दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुणांसह मराठी माध्यमात …

Read More »

ग्राहक पीठासाठी वकिलांची खानापुरात निदर्शने

खानापूर : बेळगाव येथे स्थापन करण्यात येणार्‍या ग्राहक पीठाचे कलबुर्गी येथे स्थलांतर केल्याच्या निषेधार्थ खानापूर तालुका वकील संघटनेच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली. बेळगावात स्थापन करावयाच्या ग्राहक पीठाचे कलबुर्गी येथे स्थलांतर केल्याच्या निषेधार्थ बेळगावात वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरु केले आहे. खानापुरातही या आंदोलनाचे लोण पसरले. खानापूर वकील …

Read More »