खानापूर : सीमाभागातील मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमध्ये मिळावीत, सरकारी कार्यालयावर व बसवर फलक मराठीमध्ये लावावेत या मागणीसाठी 27 जून रोजी मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठी भाषिकांचा विराट मोर्चा नेण्यात येणार आहे. या मोर्चा संदर्भात खानापूर तालुक्यामध्ये जनजागृती करण्यासाठी कापोली या ठिकाणी नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ …
Read More »ढोकेगाळी शाळेला खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची भेट
खानापूर : खानापूर तालुक्यातील ढोकेगाळी येथील मराठी शाळची इमारत कोसळली होती. याची माहिती अंजलीताईना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांशी भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व ग्रामस्थांच्या समस्या तातडीने सोडविण्याची ग्वाही दिली. शाळेची पाहणी करून शाळेची कौले काढून मोडकळीस आलेल्या छताची डागडुजी करून नवीन पत्रे …
Read More »27 जून रोजीच्या मोर्चासंदर्भात खानापूर तालुका समितीतर्फे जनजागृती
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 27 जून रोजी मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चा संबंधित जनजागृतीची सुरुवात कसबा नंदगड येथून झाली. मोर्चा संबंधित जनजागृती करण्याची बैठक समितीचे ज्येष्ठ नेते पी. एच. पाटील यांच्या घरी आयोजित करण्यात आली होती पण कसबा नंदगड गावच्या नागरिकांच्या आग्रहाने कार्यक्रम मंडपामध्ये घेण्यात …
Read More »ढोकेगाळी मराठी शाळा इमारत कोसळली
ढोकेगाळी (ता. खानापूर) : येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेची इमारत पावसामुळे कोसळली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. ढोकेगाळी मराठी शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग चालतात मात्र शाळेची इमारत मात्र तीनच खोल्यांची आहे. ती देखील मोडकळीस आलेली आणि छत देखील मोडकळीस आलेले. त्यातील एका खोलीची भिंत …
Read More »गोधोळी मराठी शाळेत कन्नड शाळेचा घाट थांबवा : विकास आघाडीची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : गोधोळी (ता. खानापूर) मराठी शाळेत कन्नड शाळा सुरू करण्याचा प्रयत्न गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केला असल्याचा खानापूर विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी आरोप केला आहे. यासाठी संबंधित शिक्षण खात्याला गोधोळी ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देऊन गोधोळी मराठी शाळेवर अन्याय झाल्यास खपवुन घेणार नाही, असा ईशाराही भरमाणी पाटील यांनी दिला. निवेदनात म्हटले …
Read More »क्षत्रिय मराठा समाज परिषद खानापूर तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई यांच्याकडून भरीव देणगी
खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा समाज परिषदेचे खानापूर तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मण्णूर येथील शिक्षण खात्याच्या डाएट ट्रेनिग सेंटर कार्यालयाला एक लाख रूपये किमतीची विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमाची पुस्तके डाएटचे प्राचार्य श्री. सिंदुर यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर खानापूर येथील कार्यालयात साधेपणाने वाढदिवसाचे आयोजन केले. यावेळी …
Read More »जटग्यात हनुमान मंदिर इमारतीचा स्लॅब भरणी उत्साहात संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : जटगे (ता. खानापूर) येथील जीर्णोद्धार करून उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिराचा स्लॅब भरणी कार्यक्रम सोमवारी दि. 13 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक मल्लू धुळापा पाटील होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आम आदमी खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील, जेडीएसचे नेते नासीर बागवान, बेळगाव येथील …
Read More »गर्लगुंजी मराठी मुलीच्या शाळेत पिण्याच्या पाण्याच्या बाॅटलचे वितरण
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी मुलीच्या शाळेत एसडीएमसी सदस्य संभाजी चौगुले यांनी स्वखर्चातून इयत्ता पहिलीच्या वर्गातील मुलीना पिण्याच्या पाण्याच्या बाॅटलचे वितरण नुकताच करण्यात आले. विद्यार्थीनीना दिवसभर पिण्याचे पाणी स्वतःचे असणे गरजेचे आहे. शरीराला पाण्याचा पुरवठा कमी पडता कामा नये. यासाठी पहिलीच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थीनीना पिण्याच्या …
Read More »मानसिक अस्वास्थामुळे खानापूर भागात भटकत असलेल्या व्यक्तीला कुटुंबियांकडे स्वाधीन
खानापूर : परभणी जिल्ह्यातील एक इसम विमनस्क अवस्थेत खानापूर तालुक्यातील शिवठाण रेल्वे ट्रॅकच्या आसपास फिरत असताना रेल्वे किमेन विष्णू नाळकर यांना भेटला. त्यांच्याकडून तो थोडा वेळ बोलत राहिला पिण्यासाठी पाणी मागितले. विष्णू यांनी बोलता बोलता त्याला तू कुठून आलास इथे, काय करतोस असे विचारले असता आपण परभणी जिल्ह्याचा असल्याचे त्याने …
Read More »अध्यक्ष निवडीची प्रक्रिया निषेधार्ह : खानापूर समितीच्या बैठकीत ठराव
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शनिवार दिनांक ११ जून २०२२ रोजी दुपारी २ वाजता माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीमध्ये २४ मार्च २०२२ रोजी एकी संदर्भात झालेल्या सर्व प्रामाणिक प्रयत्नांबद्दल विस्तृत चर्चा करण्यात आली. याचवेळी खानापूर तालुक्यात म. ए. समितीचे दोन गट २०१८ पासून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta