खानापूर : उचवडे (ता. खानापूर) येथील महात्मा जोतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी बैलूर ग्रामपंचायत अध्यक्षा अनुसया बामणे होत्या. प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी हसनेकर यांनी प्रास्ताविक करताना वाचनालय स्थापन करण्यामागचा उद्देश सांगितला. बैलूर कृषीपत्तीन बँकेचे माजी अध्यक्ष मंगेश गुरव व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. बाबुराव पाटील …
Read More »“भावांकुर” काव्यसंग्रहाचे गर्लगुंजीत थाटात प्रकाशन
खानापूर : गर्लगुंजी येथील कवी यल्लाप्पा रामचंद्र पालकर यांच्या पहिल्या भावांकुर काव्यसंग्रहाचे प्रकाशन गर्लगुंजी गावातील श्री कृष्ण मंदिर बाल विकास केंद्रामध्ये शुक्रवार दि. 13 मे रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. गर्लगुंजी ग्रामस्थ, एल्गार सामाजिक साहित्य परिषद बेळगाव आणि अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद बेळगाव यांच्या …
Read More »शिवठाणात रवळनाथ मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील शिवठाणात रवळनाथ मंदिराचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे पुजारी रामू मिराशी होते. यावेळी रवळनाथ मंदिराचा कळसारोहण कुंभार्डा येथील हंडीभडगंनाथ मठाचे मठाधिश श्री पिरयोगी मोहननाथजी यांच्याहस्ते करण्यात आला. तर रवळनाथ मंदिराचा लोकार्पण श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक, भाजपनेते विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते फित कापून करण्यात …
Read More »ज्येष्ठ कवी यल्लाप्पा पालकर यांच्या भावांकुर कवितासंग्रह उद्या प्रकाशन
बेळगांव : भावांकुर काव्यसंग्रहाचे प्रकाशन गर्लगुंजी येथील कवी यल्लाप्पा रामचंद्र पालकर यांच्या पहिल्या भावाकुर काव्यसंग्रहाचे प्रकाशन गर्लगुंजी गावातील श्री कृष्ण मंदिर बाल विकास केंद्रामध्ये शुक्रवार दि. 13 मे रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थित उपस्थित होणार आहे. एल्गार सामाजिक साहित्य परिषद बेळगाव आणि अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य …
Read More »गर्लगुंजी माऊली यात्रोत्सवात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
खानापूर (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे यंदाही गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत श्री माऊली देवीच्या यात्रोत्सवाला बुधवारी दि. ११ रोजी झालेल्या महाप्रसादाला भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविली. मंगळवारी दि. १० रोजी सायंकाळी माऊली देवीची पालखी माऊली मंदिराकडे प्रयाण झाली. त्यानंतर माऊलीदेवीची विधीवत पुजा होऊन गाऱ्हाणा घालुन यात्रेला सुरूवात झाली. बुधवारी दि. …
Read More »हब्बनहट्टीत श्रीकृष्ण मंदिराचे थाटात उद्घाटन
खानापूर : येथील हब्बनहट्टी गावात श्रीकृष्ण मंदिराचे थाटात आणि उत्साहात उद्घाटन करण्यात आले. जवळपास तीन दिवस हब्बनहट्टी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी तिसऱ्या दिवशी नाटक समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी आणि डॉ. गणपत पाटील उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांच्या …
Read More »इदलहोंड ग्राम पंचायतच्यावतीने नुतन कमानीचे उद्घाटन
खानापूर (प्रतिनिधी) : इदलहोंड (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतच्यावतीने १४ व्या वित्त आयोग निधीतून जवळपास २ लाख ५३ हजार रूपये खर्चून बेळगाव- पणजी महामार्गाजवळील इदलहोंड क्राॅसवर इदलहोंड गावात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर कमान उभारण्यात आली आहे. या कमानीचे उद्घाटन सोमवारी दि. ९ रोजी पार पडले. याप्रसंगी इदलहोंड ग्राम पंचायत अध्यक्ष चांगापा …
Read More »गर्लगुंजी गावची ग्रामदेवता श्री माऊली देवीच्या यात्रेला प्रारंभ
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावची प्रसिद्ध ग्राम देवता श्री माऊली देवीची यात्रा मंळवारी दि. १० ते शुक्रवारी दि. १३ पर्यंत होणार आहे. मंगळवारी दि. १० रोजी सकाळी गावातील विविध देवदेवतांची पुजा आर्चा होऊन सायंकाळी ४ वाजता मानकऱ्यांच्या देवघरातून पालखी वाद्याच्या नादात माऊली मंदिराकडे प्रयाण केले. यावेळी माऊली देवीला …
Read More »खानापूरात प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रिडांगणावर पार पडलेल्या प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेत ७८ क्रिकेट खेळाडूनी भाग घेतला होता. या स्पर्धेत आयपीएलप्रमाणे क्रिकेट खेळाडुचा सहभाग करून सहा क्रिकेट संघ करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात एबीडी क्रिकेट संघ विरुद्ध चव्हाटा किंग खानापूर यांच्यामध्ये खेळविण्यात आला. प्रथम फलंदाजी …
Read More »खानापूरात गुरूवंदना कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थितीसाठी जागृती
खानापूर (प्रतिनिधी) : सकल मराठा समाजाच्यावतीने दि. १५ रोजी वडगाव येथील आदर्श विद्या मंदिराच्या मैदानावर होणाऱ्या गुरूवंदना कार्यक्रमात खानापूर तालुक्यातील समाज बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांनी केले आहे. यावेळी खानापूर शहराच्या विविध भागात, जांबोटी क्राॅस स्टेशन रोड, पारिश्वाड क्राॅस, येथील व्यापारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta