Sunday , July 26 2026
Breaking News

खानापूर

खानापूरात श्री गजानन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ

पहिले बक्षिसे 1 लाख 21 हजार रू. खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील मलप्रभा क्रिडांगणावर श्रीमान गजानन गावडू पाटील पुरस्कृत क्रिकेट स्पर्धा गुरूवारी दि. 3 रोजी आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या क्रिकेट संघाला पहिले बक्षिस 1 लाख 21 हजार रूपये व ट्रॉफी तर दुसरे बक्षिस 61 हजार रूपये व ट्रॉफी अशी …

Read More »

खानापूर समितीच्या एकीसाठी त्रिसदस्यीय कमिटी

खानापूर : बेळगाव तालुक्या नंतर खानापूर समितीत एकी व्हावी अशी भावना सगळीकडे व्यक्त होत असताना माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत एकीसाठी त्रिसदस्यीय कमिटी नियुक्त करण्याचा निर्णय झाला आहे. या कमिटीने 10 मार्च पूर्वी एकीची प्रक्रिया पूर्ण करावी असे देखील ठरवण्यात आले आहे. मंगळवारी खानापूर तालुका महाराष्ट्र …

Read More »

खानापूरात तीन दिवस पाणी पुरवठा बंद

खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच कडक उन्हाळ्याला प्रारंभ झाला. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला जातो. अशावेळी खानापूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मलप्रभा नदीच्या नवीन पुलाजवळील जॅकवेल 50 एच पी विद्युत मोटारीत अचानक बिघाड होऊन पाणीपुरवठा करण्यात व्यत्यय आला आहे. लागलीच जॅकवेल 50 एच पी मोटर दुरूस्तीसाठी बेळगाव येथे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे खानापूर …

Read More »

महाशिवरात्रीनिमित्त मलप्रभा नदी घाटावर भाविकांची गर्दी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदी घाटावर खानापूर, बेळगाव तालुक्यातील भाविकांनी मंगळवारी दि. 1 मार्च रोजी महाशिवारात्रीच्या निमित्ताने स्नानासाठी एकच गर्दी केली होती. सकाळी आठ वाजल्यापासून मलप्रभा नदी घाटावर स्नान करून मलप्रभा नदीची पुजा, नैवेद्य दाखवून मनोभावे पुजा करत होते. यावेळी मलप्रभा नदी काठावर नैवेद्य व महाप्रसादासाठी स्वयंपाकाचे आयोजन …

Read More »

खानापूर आरोग्याधिकार्‍याचे बनावट शिक्के, सही वापरणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर सरकारी दवाखान्यात आरोग्य अधिकार्‍याचे बनावट शिक्के व सही वापरून संध्या सुरक्षा पेन्शन योजनेचा लाभ देणार्‍या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गजाआड केले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वासु गुरव रा. मेंडेगाळी ता. खानापूर व सरकारी दवाखान्यातील कर्मचारी इस्माईल बिडीकर यांनी मिळून हे कृत्य केले आहे. या …

Read More »

समिती सोडून गेलेल्यांचा विचार न करता मराठीसाठी लढा तीव्र करुया : रणजीत पाटील

खानापूर : जे राजकीय स्वार्थासाठी समिती सोडून राष्ट्रीय पक्षात गेले त्यांचा विचार करत बसण्यापेक्षा आपण संविधानाने घालून दिलेल्या आपल्या मातृभाषेच्या न्याय हक्कासाठी व सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली लढा तीव्र करूया, असे प्रतिपादन खानापूर युवा समितीच्या बैठकीत ग्रामपंचायत सदस्य व मध्यवर्ती समितीचे सदस्य रणजीत पाटील यांनी केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी …

Read More »

खानापूरात महाशिवरात्रीनिमित्त शिवालये सजली!

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यातील विविध गावातील शिवालये मंदिरे मंगळवारी दि. १ मार्च रोजी होण्याऱ्या महाशिवरात्रीच्या सणानिमित्त मंदिरातून रंगरंगोटी, सजावट, विद्युत रोषणाई आदीच्या कामाला सोमवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. खानापूर शहरातील हेस्काॅम कार्यालयाच्या आवारात असलेल्या महादेवाच्या मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीच्या सणाचे औचित्य साधुन मंदिराची रंगरंगोटी, सजावट, विद्युत रोषणाई, मंडप …

Read More »

आजपासून करंबळच्या धोंडदेव यात्रेला प्रारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) गावचे प्रसिद्ध ग्राम दैवत धोंडदेव यात्रेला मंगळवारी दि. २२ पासुन प्रारंभ झाली. दरवर्षा प्रमाणे सकाळी गावातील विविध देवदेवतांची मानकरीच्याहस्ते विधीवत पूजा होणार. त्यानंतर डोंगरावरील धोंडदेवाची मानकरी, पंचमंडळी, ग्रामस्थ याच्या उपस्थित विधिवत पुजा, ओटी भरणे, गार्हाणा घालणे आदी कार्यक्रम होऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. …

Read More »

खानापूर युवा समितीकडून शिक्षकांचा सन्मान

बेळगाव : खानापूर तालुक्यातील शिक्षक प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानदानाचे काम करीत आहेत. अशा शिक्षकांचा सत्कार करून युवा समिमीतीने त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन कणकुंबी हायस्कुलचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर यांनी केले. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे मराठी भाषा दिनानिमित्त रविवारी खानापूर तालुक्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात …

Read More »

झुंजवाड के. एन. शिवारात ट्रॅक्टर पलटी झाल्याने शेतकरी ठार

खानापूर (प्रतिनिधी) : झुंजवाड के. एन. (ता. खानापूर) गावच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणीचे काम करत असताना रविवारी दि. २७ रोजी दुपारी बांधावरून ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली सापडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, झुंजवाड के. एन. येथील शेतकरी बसप्पा गणपती पाटील (वय ४६) हा रविवारी …

Read More »