Tuesday , April 21 2026
Breaking News

खानापूर

शिरोली वृक्षतोडीबाबत सखोल चौकशी करावी

  खानापूर : लोंढा वन क्षेत्रामध्ये शिरोली ग्रामपंचायत सर्व्हे क्रमांक ९७ मध्ये बेकायदा ११ जातीच्या वृक्षांची दहा दिवसांपूर्वी तोड करण्यात आली. याबाबत तक्रार दाखल करण्यास वनविभागाकडून विलंब होत आहे. याप्रकरणी सरकारने उच्चस्तरीय अधिकाऱ्याची नेमणूक करून सखोल चौकशी करावी, याबाबत वनमंत्र्यांना खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे निवेदन देऊन कारवाई करावी, अशी मागणी करणार …

Read More »

गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी

  खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा या मागणीसाठी सर्व पक्षीयांच्या वतीने गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी गणेबैल टोल नाक्यावर रास्ता रोको करून धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील …

Read More »

खवले मांजराची तस्करी ; दोघांना अटक

  खानापूर : खानापूर तालुक्याच्या लोंढा वनक्षेत्रातील मोहिमेत खवले मांजराची तस्करी करून चीनला निर्यात करण्यात येत असताना दोघांना लोंढा वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. खवले मांजराची निर्यात सुरू असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळॆ लोंढा वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसापासून सतर्क राहून पाळत ठेवली होती. खानापूर विभागाच्या वनाधिकारी सुनीता …

Read More »

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात “माझा परिसर माझी जबाबदारी” स्वच्छता अभियान कार्यान्वित!

  खानापूर : मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या “स्वच्छता हीच सर्वोत्कृष्ट सेवा आहे!” या ओळीचा विद्यार्थिनींनी आदर राखावा व स्वयंशिस्तीसह आपला परिसर ही स्वच्छ ठेवावा व ठेवण्यास इतरांना उपकृत करावे या …

Read More »

हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून छळ; नवविवाहितेची आत्महत्या

  खानापूर : हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून खानापूर तालुक्यातील नंदगड येथील एका नवविवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अर्शअहमदी मुदस्सर बसरीकट्टी (19) रा. काझी गल्ली असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती मुदस्सर रियाजअहमद बसरीकट्टी (32) यास अटक करण्यात आली आहे. याबाबत समजलेली …

Read More »

खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे म. गांधी जयंतीनिमित्त पदयात्रेचे आयोजन

  खानापूर : 2 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात म. गांधी जयंती साजरी करण्यात येणार आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधून शहरातून पदयात्रा काढण्याचे आदेश केपीसीसीने दिले आहेत. खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे 2 ऑक्टोबर म. गांधी जयंती दिवशी खानापूर परिश्वाड क्रॉस येथून सकाळी ठीक 9 वाजता पदयात्रेला सुरवात होणार असून टिपू सुलतान चौक- …

Read More »

कस्तुरीरंगन अहवाल कर्नाटक सरकारने फेटाळला; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

  खानापूर : पश्चिम घाटातील संवेदनशील क्षेत्रांच्या बाबतीत टास्क फोर्सने केवळ रिमोट सेन्सिंग डेटाच्या आधारे संवेदनशील क्षेत्राची ओळख निश्चित केली आहे. त्यामुळे डॉ. के. कस्तुरीरंगन अहवालावरील केंद्राच्या मसुद्यातील सूचना जशाच्या तशा स्वीकारल्यास स्थानिक जनतेला अपरिमित त्रास सहन करावा लागेल, अशी भीती व्यक्त करत राज्य सरकारने कस्तुरीरंगन अहवाल पूर्णपणे फेटाळून लावला …

Read More »

गणेबैल टोलनाकावाल्यांची पुन्हा अरेरावी

  खानापूर : गणेबैल टोलनाक्यावर सामान्य जनतेला अजून त्रास देणे चालूच आहे. आज गणेबैल टोलनाक्यावर एक जणांची गाडी अडविली. सदर व्यक्तीने मासिक पास दाखविला तरी सुद्धा गणेबैल टोलचालकांचा अरेरावीपणा चालूच होता. शेवटी त्या सन्माननीय गृहस्थानी आपली गाडी आहे तिथेच टोलवर सोडून दुसऱ्या गाडीत बसून खानापूर गाठले. सामान्य लोकांना त्रास द्यायचा …

Read More »

मराठा मंडळ ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या 15 खेळाडू विद्यार्थिनींची राज्यस्तरीय निवड!

  खानापूर : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत देदीप्यमान यश संपादन करणाऱ्या मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथील खेळाडू विद्यार्थीनींचा आपला खेळातील दबदबा जिल्हास्तरीय स्पर्धेतही कायम राखत विविध क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय खेळ खेळण्यास पात्रता फेरीत उज्ज्वल यश संपादन करून आपला पक्का इरादा निश्चित केला आहे. बेळगाव जिल्हास्तरीय कबड्डी सांघिक स्पर्धा …

Read More »

खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी आणि वड्डेबैल गावच्या शेतकऱ्यांनी घेतला सबसिडीचा लाभ

  खानापूर : शासनातर्फे शेतीला उपयुक्त यंत्रोपकरणांवर व औजारांवर अनुदान दिले जाते. यात पावर टिलर, पावर विडर (मशागत यंत्र), रोटावेटर, पंपसेट, शाफ कटर (कुट्टी यंत्र) इत्यादी येतात. अशी यंत्रे व औजारे महागडी असल्याने शेतकऱ्यांना ती स्वस्त दरात मिळावी म्हणून शासन अनुदान मंजूर करत असते. सन 2024 सालच्या हंगामा करता खानापूरच्या …

Read More »