Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी

बोरगाव पीकेपीएस अध्यक्षपदी युवा नेते उत्तम पाटील यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड

  निपाणी (वार्ता) : सहकार महर्षी रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव जिल्ह्यात आदर्श ठरलेली बोरगाव प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या अध्यक्षपदी युवा नेते उत्तम पाटील यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी म्हणून सुमित रोड्ड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक संतोष …

Read More »

रामपूरच्या शर्यतीत दानोळीची बैलजोडी प्रथम

  महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त आयोजन : मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण निपाणी (वार्ता) : रामपूर (ता. चिकोडी) येथे महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त आयोजित दुबैली गाड्यांच्या शर्यतीत दानोळीच्या अमोल पोवार यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांकाचे १० आजाराचे बक्षिस पटकाविले. तर बंडा हवालदार-तळदगे व विक्रम शेटे- अक्कोळ यांच्या बैल गाडीने अनुक्रमे द्वितिय व तृतीय क्रमांकाची …

Read More »

कर्नाटक राज्याचे अर्थसंकल्प जनहिताचे : राजेंद्र पवार वडर

  निपाणी (वार्ता) : कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापण होऊन महिना लोटला नाही. इतक्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मांडलेले अर्थ संकल्प हे योग्य आणि जनसामान्य जनतेचा विचार करून मांडण्यात आलेले आहे. या अर्थ संकल्पआत कष्टकरी, शेतकरी, गोर गरीब आणि जनसामान्य जनतेचा विचार करून अर्थ संकल्प सादर करण्यात आले आहे. तो अर्थसंकल्प सर्वांनाच …

Read More »

विद्युत भारित तारेच्या स्पर्शाने सोलापूरच्या भाजी विक्रेत्याचा निपाणीत मृत्यू

  निपाणी (वार्ता) : येथील आठवडी बाजारात भाजी विक्रीसाठी आलेल्या विक्रेत्याला डीपी मधील विद्युत भारित तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.६) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. मारुती ज्योत्याप्पा गोलभावी (वय ३२ रा. सोलापूर-संकेश्वर) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलीस ठाणे आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, …

Read More »

खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवल्याने व्याधी मुक्त जीवन

  डॉ. जी. एस. कुलकर्णी; रोटरी क्लबमध्ये डॉक्टर्स डे निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवत आहेत. त्याला जेवण पद्धतीही कारणीभूत आहे. उतरत्या वयात कर्करोग, हृदयरोग, स्मृतीभ्रंश, पेशींची कमतरता अशा अडचणी उद्भवतात. सुखी आणि व्याधीमुक्त जीवन जगण्यासाठी खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवून नियमित व्यायाम आवश्यक आहे, असे मत डॉ. जी. …

Read More »

निपाणी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी प्रवीण तारळे

  उपाध्यक्षपदी राजेश तिळवे: एक वर्षासाठी निवड निपाणी (वार्ता) : येथील निपाणी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी प्रवीण उर्फ विरु तारळे, उपाध्यक्षपदी राजेश तिळवे तर खजिनदारपदी श्रीमंदर व्होनवाडे यांची निवड करण्यात आली. ही निवड एक वर्षासाठी केली आहे. या निवडीनंतर पदाधिकाऱ्यांचा रोटरी क्लब तर्फे सत्कार करण्यात आला. रोटरी क्लबच्या नूतन क्लब सेवा …

Read More »

निपाणी गटशिक्षणाधिकारीपदी बेनाडीच्या महादेवी नाईक रुजू

  निपाणी (वार्ता) : येथील गटशिक्षणाधिकारी रेवती मठद यांची अन्यत्र बदली झाली आहे. त्यांच्या जागी बेनाडीच्या कन्या महादेवी नाईक या गुरुवारी (ता.६) रुजू झाले आहेत. त्यानिमित्त रेवती मठद आणि नाईक यांचा गटशिक्षणाधिकारी कार्यालय व विविध शिक्षक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. महादेवी नाईक यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेनाडी येथे …

Read More »

महात्मा बसवेश्वर संस्थेमध्ये डॉक्टर्स, सी. ए. डे साजरा

  निपाणी (वार्ता) : येथील महात्मा बसवेश्वर सौहार्दमध्ये डॉक्टर्स डे व सी.ए. डे उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त डॉ. सी बी कुरबेट्टी, डॉ. एस. आर. पाटील, किशोर बाली (सी.ए) अनिमेष कुरबेट्टी, श्रीमंधर होनवडेयांचा सत्कार करण्यात आला. डॉ. सी बी कुरबेट्टी म्हणाले, महात्मा बसवेश्वर संस्थेमध्ये सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय, शैक्षणिक विषयातील मातब्बर …

Read More »

तवंदी घाटात ग्लुकोज केमिकलचा टँकर पलटी : चालक गंभीर

  निपाणी (वार्ता) : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट उतारावरील हॉटेल अमर नजीक धोकादायक वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ग्लुकोज केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. या अपघातात सुमारे ६० लाखाचे नुकसान झाले. यामध्ये चालक चमन नंदीगावी (वय ३४ रा. मुंबई) हा गंभीर जखमी झाला आहे.त्याच्यावर येथील सरकारी महात्मा …

Read More »

किरकोळ पावसात पेरणीला प्रारंभ

  निपाणी भागातील चित्र : पेरणीसाठी चांगला पाऊस आवश्यक निपाणी (वार्ता) : जून महिन्यापासून पावसाची प्रतिक्षा करत असताना अखेर जूनच्या शेवटी विलंबाने का होईना पण किरकोळ पावसाचे आगमन झाले. मात्र अजूनही तुरळक पाऊस सुरू असून चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहे. दरम्यान तुरळक झालेल्या पावसावर बळीराजाने आता मोठा पाऊस होईल, या …

Read More »