Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी

दुसऱ्यांच्या घरासमोर जीपीएस करून घरकुल रक्कम हडप

वाळकीतील घटना : तालुका पंचायत अधिकाऱ्याकडून चौकशी निपाणी (वार्ता) : दुसऱ्यांच्या घरासमोर फोटो काढून जीपीएस करून घरकुलाची रक्कम हडप केल्याची घटना २०१०-११ साली वाळकी ग्रामपंचायतमध्ये घडली आहे. याबाबत ग्रामस्थांनी सलग पाच वर्षे शासकीय अधिकाऱ्यांना पाठपुरावा करून या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तालुका पंचायतराज विभागाचे …

Read More »

कुन्नूर शुटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत मालेगाव संघ ‘अरिहंत चषक’चा मानकरी

टेंभुर्णी संघ उपविजेता : प्रेक्षकांची भरभरून दाद निपाणी (वार्ता) : कुन्नूर येथील श्री दत्त शूटिंग व्हॉलीबॉल क्लब तर्फे कुन्नूर येथे अरिहंत उद्योग समूहातर्फे आयोजित ‘अरिहंत चषक’ शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत सोमवारी (ता.३०) रात्री उशिरा झालेल्या अटीतटीच्या लढतीत मालेगाव संघ अरिहंत चषकाचा मानकरी संघ ठरला. विजेत्या संघाला उत्तम पाटील, नगरसेवक संजय सांगावकर, …

Read More »

कोगनोळीच्या चिमुकल्या आराध्याला महाराष्ट्र शासनाचा बालक्रीडा गौरव पुरस्कार

  कोगनोळी : येथील बाळासाहेब पाटील बनाप यांची नात आराध्या पद्मराज पाटील या चिमुकल्या मुलीला कोल्हापूर येथे महाराष्ट्र शासनाचा बाल क्रीडा गौरव पुरस्कार देऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले. २६ जानेवारी रोजी सकाळी छत्रपती शाहू स्टेडीयम येथे कोल्हापूर जिल्ह्यातील “कला, क्रीडा, शैक्षणिक या क्षेत्रामध्ये …

Read More »

बोरगाव येथील खत कारखान्यास आग लागून पाच कोटीचे नुकसान

  खतासह आयशर वाहन खाक : आग विझवण्यात अपयश निपाणी (वार्ता) : बोरगाव -इचलकरंजी रस्त्यावर असलेल्या खंडेलवाल बायो केमिकल खत कारखान्यास शनिवारी पहाटे आग लागून पाच कोटीचे नुकसान झाले आहे. विविध भागातून अग्निशामक दलाची वाहने येऊन सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. पहाटेच्या वेळी कारखान्यात कुणी नसल्याने सुदैवाने प्राणहानी झालेली नाही. …

Read More »

संविधानमुळे राजा मतपेटीतून जन्माला येऊ लागला

  प्राध्यापक प्रकाश नाईक : कोगनोळीत व्याख्यान कोगनोळी : स्वतंत्र पूर्व काळात राजा फक्त राणीच्या पोटाला जन्माला येत होता. 26 जानेवारी 1950 पासून राजा मतपेटीतून जन्माला येऊ लागला, असे प्रतिपादन लेखक, विचारवंत प्राध्यापक प्रकाश नाईक यांनी केले. कोगनोळी तालुका निपाणी येथील हालसिद्धनाथ नगर येथे 74 व्या प्रजासत्ताक दिनी आयोजित व्याख्यानात …

Read More »

अमलझरीची तीन वर्षानंतर सब रजिस्टर ऑफिसला नोंद

आपच्या पाठपुराव्याला यश : ग्रामस्थांमधून समाधान निपाणी (वार्ता) : अमलझरी गावाची निपाणी सब रजिस्टर कार्यालयामध्ये नोंद व्हावी, यासाठी ग्रामस्थांकडून तीन  वर्षांपासून लढा चालू होता. तरीही कोणत्याही राजकीय पक्षाकडून अथवा पक्ष प्रमुखाकडून या विषयी निवेदन देऊन सुध्दा दखल घेतली गेली नाही. अमलझरी ग्रामस्थ त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय सहन करत विवंचनेत पडले …

Read More »

भाजपा हा व्यापाऱ्यांचा पक्ष!

माजी आमदार काकासाहेब पाटील : निपाणीत काँग्रेसचा युवा मेळावा निपाणी (वार्ता) : काँग्रेस सत्तेमध्ये असताना निपाणी शहर आणि ग्रामीण भागात शाश्वत विकासाची कामे केली आहेत. मात्र भाजपचे लोकप्रतिनिधी मूलभूत सुविधा पुरवण्याच्या नावाखाली नागरिकासह तरुणांना बोलवण्याचे काम करीत आहेत, असा घनाघाती आरोप माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केला. येथील मराठा मंडळ …

Read More »

हणबरवाडी ग्रामस्थांचा प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा

  पाटील मळ्याजवळ पुलाची मागणी : मागणी न मान्य झाल्यास रस्ता काम बंद कोगनोळी : राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे नागरिकांना येणे जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. व महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाडी-वस्तीवरील विद्यार्थी व नागरिकांना महामार्गावरून गावाकडे व गावातून पुन्हा महामार्गावरून निपाणी, कोल्हापूरकडे जाण्यासाठी मोठी …

Read More »

कुन्नूरमध्ये रविवारपासून ‘अरिहंत चषक’ शुटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा

उत्तम पाटील : आंतरराष्ट्रीय १६ संघ सहभागी निपाणी (वार्ता): कुन्नूर (ता. निपाणी) येथील श्री. दत्त शूटिंग व्हॉलीबॉल क्लबतर्फे कुन्नूर येथे अरिहंत चषक शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी (ता.२९) दुपारी २ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील १६ संघ सहभागी झाले आहेत. सोमवारी (ता.३०) रात्री अंतिम सामना …

Read More »

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिलेबी, हार, गजराचे स्टॉल

२०० रुपये किलो जिलेबी :१०० रुपयापुढे हार निपाणी (वार्ता) : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर निपाणी शहरात जिलेबी चे स्टॉल, फुलांचे हार आणि गजर यांच्या स्टॉलवर खरेदीसाठी बुधवारी (ता.२५) सायंकाळी गर्दी झाली होती. यावर्षी जिलेबी प्रति किलो २०० रुपये, फुलांचे हार १०० रुपयावर तर गजरे २५ रुपयाच्या पुढे विक्री केली जात होती. …

Read More »