Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणी

निपाणीचे नगरसेवक शौकत मनेर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

  निपाणी (वार्ता) : राष्ट्रीय पातळीवर काम करणार्‍या राजस्थान येथील बडीखाटू जायल येथील संत कबीर आश्रम सेवा संस्थान यांच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देऊन निपाणीतील नगरसेवक शौकत मनेर यांना गौरवण्यात आले. मनेर यांच्या सामाजिक सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार 5 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय …

Read More »

हणबरवाडी येथे बिबट्याचे दर्शन नागरिकात घबराट : शोध सुरू

    कोगनोळी  : हणबरवाडी तालुका निपाणी येथे रविवार तारीख 4 रोजी रात्री 12 च्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हणबरवाडी आडी मल्लया रोडवर दीपक कदम यांच्या घरालगत शेतातून मुख्य रस्त्यावरून बिबट्या जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. हणबरवाडी येथील …

Read More »

आप्पाचीवाडी फाट्याजवळ अपघातात चालक ठार

  कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या अप्पाचीवाडी फाट्याजवळ अपघातात चालक  ठार झाल्याची घटना सोमवार तारीख सहा रोजी सायंकाळी 7 वाजता घडली. चालक-मालक सुरेंद्र चव्हाण (वय 28) राहणार पालघर ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, स्वतः मालक व चालत असणारे सुरेंद्र चव्हाण आयशर गाडी …

Read More »

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अरिहंत शिष्यवृत्तीचा आधार

सहकारत्न रावसाहेब पाटील :१५२ विद्यार्थ्यांना ७ लाख रुपये वाटप बोरगांव (वार्ता) : अरिहंत उद्योग समूहाकडून सहकार धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम सुरू आहे. सभासदांच्या सभासदांच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. सात वर्षापासून शिष्यवृत्ती योजना चालु असून ७५ टक्के पेक्षा जादा गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. यंदा …

Read More »

रासाई शेंडूर १३ पासून भैरवनाथ यात्रा

धार्मिक कार्यक्रमासह शर्यती, कुस्ती मैदान : लेझीम स्पर्धेचे आकर्षण निपाणी (वार्ता) : शेंडूर येथील श्री रासाई, भैरवनाथ यात्रा रविवारपासून (ता.१२) सुरू होणार आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच विविध शर्यतींचे आयोजन केल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली. रविवारी (ता. १२) सकाळी ६ वाजता श्री भैरवनाथ देवास अभिषेक व जागर, सकाळी ९ …

Read More »

शैक्षणिक क्रांतीसाठी निरंतर कार्यरत

  मंत्री शशिकला जोल्ले : स्काऊट गाईड विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी : मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून निवडून दिले आहे. त्यांच्यामुळेच आपण मंत्रीपदापर्यंत पोहोचून आतापर्यंत निपाणी मतदारसंघात विविध विकास कामे केली आहेत. या कामासह शिक्षणालाही महत्त्व देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्या निकालात काढल्या आहेत, असे मत मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. …

Read More »

निपाणी भागाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न

आमदार चन्नराज हट्टीहोळी :अक्कोळमध्ये समुदाय भवनाचे भूमिपूजन  निपाणी (वार्ता) : विधानसभा परिषद निवडणुकीत या भागातील नागरिकांनी आपल्याला संधी दिली आहे. निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार सध्या कामाला सुरुवात केली आहे. निपाणी भागातील विविध विकास कामासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही विधानपरिषद सदस्य आमदार चन्नराज हट्टीहोळी यांनी दिली. अक्कोळ येथे त्यांनी आपल्या …

Read More »

कोगनोळीजवळ अपघातात चालकाचा मृत्यू

कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर शेतकरी पेट्रोल पंपाजवळ अपघातात आयशर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार तारीख 4 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. शामराव रामू भोगत (वय 40) कोवाड चंदगड असे मृत चालकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांच्या कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फरशी वाहतूक करणारा कंटेनर …

Read More »

निपाणी प्रथमच वैद्यकीय सेवेसाठी मोफत रिक्षा

मध्यवर्ती रिक्षा असोसिएशनचा उपक्रम : शहरवासीयांनी केले कौतुक निपाणी (वार्ता) : येथील शहर मध्यवर्ती रिक्षा चालक-मालक संघटनने तर्फे आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रम  राबविण्यात आले आहे. वैद्यकीय अडचणीच्या वेळी गरजूंना वेळेत औषधोपचार होऊन त्यांना जीवनदान मिळण्यासाठी मोफत रिक्षा वाहतूक योजना बुधवारपासून (ता.१) सुरू केली आहे. त्याचा निपाणी शहर आणि उपनगरातील नागरिकांना …

Read More »

नगरसेवकांची बदनामी करण्याचे षडयंत्र : नगरसेवक विलास गाडीवड्डर

कार्यकर्त्यांच्या विचारातूनच पुढील निर्णय निपाणी : आई-वडिल आणि कार्यकर्त्यांनी आपल्याला मोठे केले असून आम्ही मोठे केले या भ्रमात कोणत्याही नेत्याने राहू नये. सुरुवातीपासून आपण आक्रमक भूमिका घेतली. मात्र गेले वर्षभर राजकारणाचा भाग म्हणून शत्रूला गाफील ठेवण्यासाठी विरोधी नगरसेवक शांत राहिले. गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपचे सरकार आहे त्यामुळे याचा निपाणीकरांना लाभ …

Read More »